‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात यंदा तिच्या लग्नामुळे खूपच चर्चेत राहिली. तिने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तिचा लग्नसोहळा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. वनिता सध्या तिचं वैवाहिक जीवन जगतेय. पण, वनिताचा पती काय करतो हे तुम्हाला माहितीये का? तिनेच तिचा पती काय काम करतो याबद्दल सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“लग्नापूर्वी माझी अफेअर्स होती पण…”, लग्नानंतर वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाली, “याआधी मी…”

वनिता म्हणाली, “लग्नाआधी माझी अफेअर्स होती. त्यामुळे आता अफेअर करायचं नाही, असं माझं म्हणणं होतं. खरं तर थेट लग्न करायचं, याही मताची मी नाही. पण मला स्वतःला लग्न करायचं होतं. याआधी मी रिलेशनशिप्सचा खूप अनुभव घेतला होता. सुमित आणि माझंही लग्न करायचं ठरलं होतं. म्हणून आम्ही दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला”.

पती सुमित लोंढे कोणतं काम करतो, त्याचा खुलासाही वनिताने केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, “तो एका मार्केटिंग कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो,” असं तिने सांगितलं. वनिताने लग्नानंतर तिच्या आयुष्यात घडलेल्या बदलांबद्दल सांगितले, ती म्हणाली, “मला प्रत्यक्षात कोणताही बदल जाणवत नाही. अचानक बदल किंवा बदल असे काहीही नाही. आमचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे वेगळं काही वाटत नाही, चांगल्या भावना आहेत. लग्न झाल्यावर मला खूप छान वाटतंय.”