अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. पण त्याचबरोबरीने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं. वनिताचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिताने फेब्रुवारी महिन्यात सुमित लोंढेशी लग्न केलं. जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. त्यानंतर वनिता सोशल मीडियावर सक्रिय राहून तिचे आणि सुमितचे काही गमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. आता तिने नुकताच पोस्ट केलेला तिच्या नवऱ्याबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : मराठी, हिंदीपाठोपाठ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला खुणावतंय टॉलिवूड; म्हणाली, “मला दक्षिणात्य सिनेसृष्टीत…”

वनिताने काल तिचा नवरा सुमितबरोबरचं एक रील पोस्ट केलं. या व्हिडीओत वनिता नवझुद्दीन सिद्दीकीच्या ‘मांझी द माउंटन मॅन’ चित्रपटातील “ओह फगुनिया….” हा प्रसिद्ध डायलॉग सुमितकडे बघून बोलताना दिसत आहे. तर हा डायलॉग बोलत असताना तिने सुमितला गालावर किसही केलं.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, जोडप्याच्या साधेपणाने वेधलं लक्ष

आता वनिताने पोस्ट केलेला हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. यावर प्रतिक्रिया देत तिचे चाहते त्यांचा हा मजेशीर अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. तर याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील तिच्या सहकलाकारांनीही यावर कमेंट करत त्यांचा हा व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanita kharat kisses her husband saying famous dialogue from a film video gets viral rnv