चित्रपट, मालिकांमधील कलाकार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. अनेकदा या कलाकारांनी केलेली वक्तव्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. मुलाखतींमध्ये बऱ्याचदा चित्रपट, मालिकांच्या शूटिंगदरम्यानचे अनुभव, सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, तर काही वेळा खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींचादेखील हे कलाकार उलगडा करताना दिसतात. आता अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat)ने ९० च्या दशकातलं कोणतं गाणं आवडतं हे सांगताना त्याचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात नेमकं काय म्हणाली?

अभिनेत्री वनिता खरातने नुकताच नवशक्तीबरोबर संवाद साधला. त्यावेळी तिला एक टास्क देण्यात आला. तिच्या हातात एक रेडिओ देत तिला सांगितले की यामध्ये ९० च्या दशकातलं एक गाणं टाकायचं आहे, म्हणजेच तिचं एखादं आवडतं गाणं सांगायचं आहे. त्यावर वनिता खरातने म्हटलं, “माझा एक बॉयफ्रेंड होता, त्याच्या फोनची एक रिंगटोन होती, ती माझ्या लक्षात आहे. ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं’, अशी ती रिंगटोन होती”, असे वनिताने हसत सांगितले.

हेही वाचा: Video : ‘पुष्पा २’च्या ‘किसिक’ गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त अंदाज! मधुरा जोशीसह केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

पुढे तिला विचारले की, हे गाणे बॉयफ्रेंडची रिंगटोन होती म्हणून आवडायचे का? यावर उत्तर देताना वनिता खरातने म्हटले, “त्याची रिंगटोन होती म्हणून आवडायचे आणि पुढे ब्रेकअप झाल्यावरसुद्धा हेच गाणे मी ऐकत असे”, असेही वनिताने म्हटले. ‘सूर्यवंशम’, ‘हम साथ साथ है’, हे चित्रपट खूप वेळा बघितल्याचे म्हटले; तर ‘मैय्या यशोदा’ या गाण्यावर स्नेहसंमेलनात अनेकदा डान्स केल्याची आठवण सांगितली आहे.

हेही वाचा: झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…

वनिता खरातच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. अभिनेत्रीने एकपात्री नाटकातून अभिनयाची सुरूवात केली होती. अभिनयसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला खूप संघर्ष केला. मराठीसह वनिता खरात बॉलीवूडमध्येदेखील काम केले आहे. शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला कबीर सिंग चित्रपटात साकारलेल्या भूमिकेतून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. याबरोबरच तिने अनेक मराठी चित्रपटांतदेखील काम केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanita kharat recounts a favorite 90s song reveals reason nsp