‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाला २ ऑगस्टला बरोबर ६ महिने पूर्ण झाल्याने अभिनेत्रीने लग्नातील खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ वनिता आणि सुमितच्या रिसेप्शन सोहळ्यातील आहे. यामध्ये मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
हेही वाचा : “…म्हणून प्रियाशी लग्न केलं”, उमेश कामतने केला मजेशीर खुलासा; म्हणाला, “तिच्यासारखी बायको…”
वनिता खरातने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला हास्यजत्रेतील तिचा सहकलाकार गौरव मोरे लक्ष वेधून घेतो. यामध्ये गौरव म्हणतो, “मला बऱ्याच लोकांनी सांगितले तुमची मुलीकडची बाजू आहे…कोण म्हणतंय आमची मुलीकडची बाजू पडकी आहे जरा मला सांगा? असं म्हणतात, नवरा आला वेशीपाशी… पण, आमचं जरा वेगळ आहे नवरी आली वेशीपाशी…चला सर्वांनी वनिता आणि सुमितसाठी टाळ्या वाजवा.” गौरवसह समीर चौघुले, शिवाली परब, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, निर्मिती सावंत, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप असे बरेच कलाकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे झळकणार चित्रपटात; ‘ही’ भूमिका साकारणार
वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री अनघा अतुलने यावर “किती सुंदर…” अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने, “सर्वांना अशी मजा करताना पाहून खूप छान वाटलं” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : लग्न न करता अभिनेत्री झाली आई; ट्रोल झाल्यावर सोडलं मौन, म्हणाली, “मी आधीच…”
दरम्यान, वनिताने नाटकांपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे, ‘कबीर सिंग’ चित्रपटातील भूमिका आणि हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली. यावर्षी २ फेब्रुवारीला वनिता आणि सुमित विवाहबंधनात अडकले. १४ ऑगस्टपासून अभिनेत्री पुन्हा एकदा हास्यजत्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.