छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अभिनेत्री वनिता खरातची लगीनघाई सुरू झाली आहे. वनिता वरळी येथील कोळीवाड्यात राहते. तिची वरळी कोळीवाड्यामध्येच अगदी जोरदार हळद झाली. तिच्या हळदीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आता तिचा एक नवा लूक समोर आला आहे.
वनिता खरातच्या हळदीसाठी मराठी कलाकार वरळी कोळीवाड्यात पोहोचले होते. आता वनिता व सुमितला पुन्हा एकदा एकत्र हळद लागली आहे. तिचे हळदी सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियार व्हायरल झाले आहेत. शिवाय वनिताच्या मित्र-मंडळींनी भर मंडपातच डान्स करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे.
वनिताने हळदी सोहळ्यासाठी पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर सुमितनेही त्याच रंगाचा कुर्ता परिधान केला. या दोघांच्याही आऊटफिटवर पिवळ्या रंगाची फ्लोरल डिझाइन पाहायला मिळाली. तर वनिता व सुमितच्या मित्र-मंडळींनी हळदी कार्यक्रम अगदी मनसोक्त एण्जॉय केला.
शिवाली परब, चेतना भट, रोहित माने, नम्रता संभेराव यांसारख्या अनेक कलाकारांनी वनिताच्या हळदी सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्याने फोटो नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. तर ज्या ठिकाणी वनिताला हळद लागली तो मंडपही अगदी सुंदर सजवण्यात आला आहे.