‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २०२३च्या २ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर तिने अगदी थाटामाटात लग्न केलं. तिचा लग्नसोहळा अगदी चर्चेचा विषय ठरला होता. वनिता आता तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. लग्नानंतरचं आयुष्य ती एण्जॉय करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वनिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिता व सुमित यांच्यामध्ये आधी मैत्री झाली. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचं प्रेमामध्ये रुपांतर झालं. एकमेकांना अधिक काळ डेट न करता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाआधीही वनिताची अफेअर्स होती. याबाबत तिने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलेपणाने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – “मेकअप करणाऱ्याला…” लूकवरुन ट्रोल करणाऱ्यावर भडकली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब, म्हणाली, “काळजी करु नको कारण…”

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

ती म्हणाली, “लग्नाआधी माझी अफेअर्स होती. त्याच गोष्टींमुळे माझं हेच म्हणणं होतं की आता अफेअर करायचं नाही. आधी अफेअर करायचं नाही थेट लग्न करुया याही मताची मी नाही. पण मला स्वतःला लग्न करायचं होतं. कारण याआधी मी खूप अनुभव घेतला होता. सुमित आणि माझंही लग्न करायचंच ठरलं होतं. म्हणून आम्ही दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला”.

आणखी वाचा – Video : धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर जोरदार दारू पार्टी, स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “माझे मित्र…”

वनिता नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसली. लग्नाच्या काही महिन्यांपूर्वीच तिने सुमितबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला. फोटो शेअर करत तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली. वनिता सुमितबाबत अगदी भरभरुन बोलताना दिसते. तसेच सुमितलाही त्याची पत्नी एक उत्तम अभिनेत्री असल्याचा अभिमान आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanita kharat talk about her affair before marriage with boyfriend sumit londhe see details kmd