‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिताने अभिनयाच्या जोरावर मनोरंजनविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या वनिताने काही वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोशूटची बरीच चर्चा रंगली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिता खरातने नुकतीच संपूर्ण स्वराज या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वैयक्तिक व मनोरंजनविश्वातील अनेक गोष्टींबाबत खुलासे केले. यावेळी वनिताने न्यूड फोटोशूटबाबतही भाष्य केलं. “फोटोशूटनंतर अशी एखादी कमेंट ज्यामुळे तुला वाईट वाटलं?” असा प्रश्न वनिताला विचारण्यात आला. यावर वनिताने “मी कमेंट बघतच नाही. मला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे या गोष्टींनी काही फरकही पडत नाही. न्यूड फोटोशूटवर मला एवढ्या चांगल्या कमेंट्स मिळाल्या, ज्यामुळे माझं अशा वाईट कमेंटकडे लक्षच गेलं नाही,” असं उत्तर दिलं.

हेही वाचा>> सनी देओलने शेअर केला ‘गदर २’च्या सेटवरील फोटो, तारा सिंगचा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “पाकिस्तानचा जावई…”

वनिताने याबरोबरच न्यूड फोटोशूटचा एक किस्साही सांगितला. वनिता म्हणाली, “न्यूड फोटोशूटनंतर माझ्या एका मित्राने मला फोन केला होता. वनिता तुला माहीत नाहीये, तू काय केलंस. मी तुझा हा फोटो माझ्या घरात फ्रेम करुन लावणार आहे. माझ्या सगळ्या बहिणींना तुझा फोटो दाखवून हे कमाल आहे, असं मी सांगणार आहे, असं तो मित्र म्हणाला.”

हेही वाचा>> प्रियांका चोप्राच्या घरी छापेमारी झाल्यावर टॉवेलमध्ये असलेल्या शाहीद कपूरने उघडलेला दरवाजा अन्…; अभिनेत्री सत्य सांगत म्हणालेली…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या वनिता खरातने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. मराठीबरोबरच वनिताने बॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शाहीद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटात वनिता झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanita kharat talk about her nude photoshoot said my friend call me after viral photos kak