छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधूनच वनिता खरात घराघरात पोहोचली. विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या वनिताने अल्पावधीतच मनोरंजनविश्वात स्वत: चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच वनितावे हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं. ‘कबीर सिंग’ चित्रपटात तिने शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती.
वनिताने नुकतीच संपूर्ण स्वराज या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वैयक्तिक जीवनातील व मनोरंजन विश्वातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. याबरोबरच वनिताने बॉलिवूडबद्दलही मुलाखतीत भाष्य केलं. या मुलाखतीत वनिताला तिच्या आवडत्या चित्रपटांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “तुला आवडणाऱ्या पाच चित्रपटांची नावं सांग,” असा प्रश्न वनिताला विचारला गेला. यावर उत्तर देताना वनिताने प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
हेही वाचा>> “गँग्स ऑफ वासेपूर आणि मिर्झापूरमध्ये…”, वनिता खरात नेमकं काय म्हणाली?
“विकी कौशलचा मसान चित्रपट आवडतो,” असं वनिता म्हणाली. पुढे तिने “गँग्स ऑफ वासेपूर आणि मिर्झापूर या चित्रपटांमध्ये काम करायला मला आवडलं असतं. वास्तववादी चित्रपट मला खूप आवडतात. नीट निटके चित्रपट मला आवडत नाहीत. म्हणून अनुराग कश्यप हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. जे आहे ते आणि तसं अनुराग कश्यप त्याच्या चित्रपटांतून दाखवतो. अशा चित्रपटांत काम करायला मला आवडेल,” असं सांगितलं.
हेही वाचा>> ‘कबीर सिंग’मधील काम पाहून शाहीद कपूर वनिता खरातला काय म्हणाला? अभिनेत्रीने केला खुलासा
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या वनिताने अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटातही वनिता झळकली आहे. याबरोबरच तिने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.