‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात अलीकडेच विवाहबंधनात अडकली. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत २ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने याच कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर अभिनेता आस्ताद काळने केलेल्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियदर्शनी इंदलकर हिने इन्स्टाग्रामवर वनिता खरातच्या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत वनिता खरातच्या लग्नात केलेला डान्स, धमाल, मस्ती सर्व पाहायला मिळत आहे. ‘बरीचशी धावपळ, भरपूर रडारड, खूप दंगा आणि आभाळभर आनंद! थोडक्यात वनीचं लग्न!’ असे कॅप्शन प्रियाने या फोटोंना दिले आहे.
आणखी वाचा : Video : “मी एखादा फोटो शेअर केल्यावर गौरव लगेचच…” सई ताम्हणकरने केला खुलासा

यावेळी प्रियदर्शनीने छान साडी परिधान केली आहे. त्याबरोबर तिने नाकात नथ, हातावर मेहंदी असा पारंपारिक लूकही केला आहे. या फोटोत तिने अभिनेता ओंकार राऊतबरोबरच एक फोटो शेअर केला आहे. यात ती ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसताना दिसत आहे. तर दुसरीकडे ओंकार हा तिच्याकडे गोड पाहत आहे.

या फोटो पाहताच तिच्या अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर अभिनेता आस्ताद काळे यानेही यावर कमेंट केली आहे. ‘ज्या पद्धतीने ओमकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आणि आनंदी राहा मित्रांनो’ अशी कमेंट आस्तादने या फोटोवर केली आहे.

आणखी वाचा : Video : वनिता खरातच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, डिझाईनची सोशल मीडियावर चर्चा

आस्तादची ही कमेंट वाचून प्रियदर्शनीनेही त्यावर उत्तर दिले आहे. यावर तिने ‘हाहाहाहा! अरे काय तुम्ही पण’ असे म्हटलं आहे. त्यावर आस्तादनेही ‘अर्रर्र!!!!! मनापासून आशीर्वाद देतोय’ असं उत्तर दिलं. प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊतच्या या फोटोवर आस्तादने केलेल्या या कमेंटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अनेक चाहते यावर विविध कमेंट करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanita kharat wedding aastad kale comments on maharashtrachi hasyajatra actress priyadarshini indalkar onkar raut photo nrp