Bigg Boss Marathi Varsha Usgaonkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. खेळ सुरू झाल्यावर पहिल्या दिवसांपासून घरातील सगळ्या स्पर्धकांमध्ये वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणारी निक्की तांबोळी अन् मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर या दोघींमध्ये टोकाचे वाद सुरू आहेत. या भांडणामध्ये निक्कीने स्वत:ची पातळी सोडून माझा अपमान केला असे आरोप वर्षा यांनी केले आहेत. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत.

निक्कीच्या वागणुकीवर नेटकऱ्यांसह पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे या अभिनेत्यांनी टीका केली होती. आता वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी आणखी एक अभिनेता खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्याने वर्षा उसगांवकरांच्या मोठ्या लेकाची भूमिका साकारली होती. कपिल होनरावने अभिनेत्रीला धीर देतानाचे मालिकेतील सीन्स दरम्यानचे काही फोटो देखील या पोस्टसह शेअर केले आहे.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
CM Devendra Fadnavis Answer to Sharad Pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांच्या पराभवाच्या गणिताला गणितानेच उत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून…”

हेही वाचा : Kalki 2898 AD बॉक्स ऑफिस गाजवल्यावर OTT वर होणार प्रदर्शित; कुठे पाहता येणार अमिताभ बच्चन, प्रभासचा सिनेमा?

वर्षा उसगांवकरांसाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट ( Varsha Usgaonkar )

कपिल लिहितो, “Be Strong माई…ते लोक हिच्याशी अत्यंत चुकीचं वागले. ज्यांनी तुला वाटेत झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र…मला आशा आहे की रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील. #truewinner #degnity” या पोस्टमध्ये अभिनेत्याने ‘कलर्स मराठी’ व वर्षा उसगांवकरांना टॅग केलं आहे.

हेही वाचा : क्रांती रेडकरच्या आईने चार्जर पाठवण्यासाठी लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “समीर वानखेडे यांच्या सासूबाई…”

‘बिग बॉस मराठी’मध्ये यंदा १६ स्पर्धकांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये दोन ग्रुप पडल्याचं पाहायला मिळालं. निक्की – वर्षा, निक्की – आर्या, निक्की – अंकिता, जान्हवी – आर्या, जान्हवी – योगिता या स्पर्धकांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

 Varsha Usgaonkar
वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar )

हेही वाचा : दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत ८ महिन्यात वेगळी झाली अभिनेत्री, आता तो गर्लफ्रेंडसह आला मुंबईत, फोटो व्हायरल

दरम्यान, पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, पुरुषोत्तम पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे येत्या वीकेंडला रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे.

Story img Loader