अनेक वर्षं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वर्षा उसगांवकर. उत्तमोत्तम चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये काम करत अनेक वर्षं त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना चाहत्यांचे अनेक विचित्र अनुभव आले. तर आता नुकतेच त्यापैकी काही अनुभव त्यांनी शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्षा उसगांवकर नुकत्याच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबरच मंदाकिनी आणि संगीता बिजलानीही सहभागी झाल्या होत्या. या वेळी या तिघींनी दिलखुलासपणे त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं. तर याचबरोबर त्यांनी त्यांना आलेले अनेक गमतीशीर अनुभवही सांगितले. या कार्यक्रमात वर्षा उसगांवकर यांनी अनेकदा चाहत्यांमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याचं सांगितलं.

आणखी वाचा : Exclusive video: अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगांवकर? अभिनेत्रीने केला खुलासा

चाहत्यांचे विचित्र आलेले अनुभव सांगताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “एकदा मी ट्रेनने प्रवास करत होते. मी खूप दमले होते त्यामुळे मी ट्रेनमध्ये झोपले होते. इतक्यात माझा चाहता माझ्याकडे आला आणि त्यांनी उठवलं. माझं स्टेशन येत आहे आणि मला तुमची सही हवी आहे, हे कारण त्यांनी मला सांगितलं.”

हेही वाचा : Video: ठाण्यात येताच विकी कौशलने चाहत्यांशी मराठीतून दिलखुलासपणे साधला संवाद, म्हणाला…

पुढे त्या म्हणाल्या, “तर एकदा मी कोल्हापूरमध्ये शूटिंग करत होते. त्या वेळी मी एका हॉटेलमध्ये थांबले असताना सकाळी साडेसहा वाजता माझ्या रूमची बेल वाजली. मला वाटलं की हॉटेलमधील कोणी सफाई कर्मचारी असेल. मी नुकतीच झोपेतून उठली असल्याने पूर्ण अवतारात होते. मी दार उघडलं तर तो माझा चाहता होता. तो मला म्हणाला की, मॅडम मला तुमची सही हवी आहे. इतक्या सकाळी फक्त सहीसाठी त्याने माझ्या रूमची बेल वाजवल्यामुळे मी त्याला ओरडले होते.”