‘पुन्हा कर्तव्य आहे'( Punha Kartvya Aahe) या मालिकेत सध्या सतत नवनवीन गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. आकाशला गोळी लागली असून, तो दवाखान्यात आहे. त्याला अजूनही शुद्ध आलेली नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबासह वसुंधरादेखील काळजीत असल्याचे दिसत आहे. आता आकाशला बरे वाटावे म्हणून वसुंधरा मोठे पाऊल उचलणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाशवर जीवघेणा हल्ला…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, वसुंधरा घराबाहेर बसली असून, तिला आकाशबद्दल काळजी वाटत आहे. आकाश अजून शुद्धीत आला नाही, असे डॉक्टरने सांगितलेले शब्द तिला आठवत आहेत. तोपर्यंत तिला, “जोगवा दे गं माय”, असा आवाज ऐकू येतो. ती महिला वसुंधराला विचारते की, “काय मागशील देवीकडे?”, वसुंधरा म्हणते, “माझा नवरा”, ती महिला सांगते, “जंगलातल्या मंदिरात जा. हातात दिवा घ्यायचा. मंदिराला ५०१ फेऱ्या मारायच्या आणि दिवा तर अजिबात विझू द्यायचा नाही.” वसुंधरा त्या महिलेने सांगितल्याप्रमाणे सर्व काही करताना दिसते. तिच्याबरोबर चिनू-मनू व बनीसुद्धा दिसत आहेत. शेवटी वसुंधरा देवीसमोर जाते आणि म्हणते, “त्यांची सगळी दुखणी मला देऊन टाक.” त्यानंतर ती बेशुद्ध होऊन देवीच्या पायाशी पडते. दुसरीकडे आकाशला शुद्ध येताना दिसत आहे. दुसर्‍या एका प्रोमोमध्ये वसुंधराचा पहिला नवरा शार्दुल दवाखान्यात आला असून तो आकाशचा गळा दाबताना दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना, “वसूचं व्रत फळास येईल का, आकाशच्या तब्येतीत सुधारणा होईल का?”, अशी कॅप्शन झी मराठी वाहिनीने दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे बनीला वाचवण्यासाठी गेल्यानंतर आकाशला गोळी लागते. वसुंधरा मोठ्या प्रयत्नाने त्याला दवाखान्यात घेऊन जाते. या सगळ्यात तिलाही दुखापत होते. दोघांनाही दवाखान्यात दाखल केले जाते. वसुंधरा बरी होते; मात्र गोळी लागल्यामुळे अद्याप आकाश शुद्धीत आलेला नाही. त्यामुळे वसुंधरा मोठ्या काळजीत आहे. आता तो बरा व्हावा यासाठी तिने व्रत केले आहे. आता आकाशला बरे वाटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: दीड वर्षापूर्वी बिझनेसमनशी लग्न करणारी बॉलीवूड अभिनेत्री झाली आई, मुलीला दिला जन्म

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasundhara praying for aakash shardul trying to kill him punha kartvya aahe marathi serial watch promo nsp