ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी(१८ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ त्यांनी गाजवला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तबस्सूम यांच्या एका कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू होते. काही भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित भागांचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी त्यांना पुन्हा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

actor Sudip Pandey died of heart attack
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?

हेही वाचा >> ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, निधन झाल्यानंतर दोन दिवस याबाबतची माहिती द्यायची नाही, अशी तबस्सूम यांची इच्छा होती. तबस्सूम यांचा मुलगा होशांग म्हणाला, “सर्दी, खोकला झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आतड्यांचाही त्रास जाणवू लागला होता. शुक्रवारी रात्री ८:४० वाजता हृदयविकारचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. निधन झाल्यानंतर दोन दिवस याबाबतचे वृत्त द्यायचे नाही, अशी तिची शेवटची इच्छा होती”.

आणखी वाचा >> व्हीलचेअरवर बसून तबस्सूम शो होस्ट करत असतानाच आग लागली अन्…; अमिताभ बच्चन यांनी वाचवलेला जीव

१९४७ साली वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘नर्गिस’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर ‘बैजू बावरा’ चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचालन केले होते. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’, ’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केलं आहे.

Story img Loader