‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले २८ जानेवारी रोजी पार पडला. या शोचा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला. तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ग्रँड फिनालेमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिली. ती पती विकी जैनबरोबर या शोमध्ये सहभागी झाली होती. विकी जैन फिनालेमध्ये पोहोचण्याआधीच घराबाहेर पडला होता.
या शोमधील चार महिन्यांच्या प्रवासात अंकिता लोखंडे व विकी जैन या जोडप्याची खूप भांडणं पाहायला मिळाली. अनेकदा ते एकमेकांवर चिडताना, एकमेकांना वाईट बोलतानाही दिसले. पण शो संपल्यावर मात्र विकीने अंकितासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. “अंकिता, तू जैन आणि लोखंडेंना अभिमान वाटेल असं काम केलंय. तू ज्या पद्धतीने खेळलीस आणि हार मानली नाही त्या सगळ्या गोष्टीत तू उत्तम होतीस. मला खात्री आहे की तुझे चाहते, मित्र-मैत्रिणी सर्वांना तुझा अभिमान वाटत असेल,” असं विकी जैनने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“अंकिता लोखंडेने चार लग्नं…”, सलमान खानचा मोठा खुलासा; अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली…
दरम्यान, ग्रँड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेच्या सासूबाईंनी तिला एक वचन मागितलं होतं. कुटुंबाचं नाव खराब होईल, असं काहीही तू करायचं नाही असं त्या म्हणाल्या होत्या. त्याआधी फॅमिली वीकमध्ये घरात आल्यानंतर त्या अंकिताशी ज्या पद्धतीने वागल्या त्यानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली होती. बाहेर आल्यावरही आपण विकी व अंकिताच्या लग्नाच्या विरोधात होतो, अंकितावर खूप पैसा खर्च करावा लागतो, असं त्या म्हणाल्या होत्या. यावरून घरात विकी व अंकिताची भांडणं झाली होती. त्यानंतर आता विकीने केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे.