अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटाच्या यशाने विकीच्या नावावर आणखी एक हिट चित्रपटाची नोंद झाली आहे. अशातच विकी कौशल वर्गमित्र होता, असा खुलासा एका सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला आहे.

‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit) ही विकी कौशलबरोबर एकाच वर्गात शिकत होती. तिने स्वतः एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. विकी अभ्यासात कसा होता, तेही तिने सांगितलं. शाळेत एकत्र शिकतानाच्या काही आठवणीही रिद्धिमाने सांगितल्या.

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

“माझी मुलगी तीन आठवड्यांपासून आधार कार्डसाठी…”, बॉलीवूड दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप; मिळालं ‘हे’ उत्तर

रिद्धिमाने सांगितल्या विकी कौशलबरोबरच्या आठवणी

Ridhima Pandit Vicky Kaushal studied together: ‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा म्हणाली, विकी कौशल माझा शाळेतला मित्र आहे. विकी व मी एकाच बाकावर बसायचो. त्याने सातवीनंतर शाळा बदलली व मी आठवीनंतर शाळा बदलली. आता आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा खूप प्रेमाने भेटतो. तो शाळेत सर्व शिक्षकांचा आवडता होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. शाळेत तो खूप कमी बोलायचा. आता त्याला पाहिल्यावर कोणाला विश्वास बसणार नाही. तो अजिबात खोडकर नव्हता. सनी आमच्यापेक्षा वर्षभराने लहान आहे. तो खूप क्यूट होता. जेवणाच्या सुट्टीत तो टिफिन बॉक्स घेऊन नेहमी आमच्या वर्गात यायचा. नुकतेच मी त्याला एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगला भेटले, त्यावेळी मी या सगळ्या आठवणी सांगितल्या आणि आम्ही हसू लागलो. या सर्वच त्यांच्याबरोबरच्या आठवणी आहेत.

Ridhima Pandit vicky kaushal were classmates
रिद्धिमा पंडित व विकी कौशल (फोटो – इन्स्टाग्राम)

‘तू ‘लंबू’ला गाडी दिलीस?’ अमिताभ बच्चन यांना कोट्यवधींची कार दिल्यावर दिग्दर्शकाला मुर्ख म्हणत आईने मारली होती झापड

यावेळी रिद्धिमाने विकीची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Ridhima Pandit praised Katrina Kaif) हिचं कौतुक केलं. कतरिना खूप प्रतिभावान आहे, असं रिद्धिमा म्हणाली. रिद्धिमा ही अरबाज खानची पत्नी शुरा खान हिची खास मैत्रीण आहे. तसेच ती व रवीना टंडनदेखील चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा रिद्धिमा त्यांच्याबरोबर पार्टी करताना दिसते.

२१ वर्षांचा संसार मोडला, आता मॉडेलला डेट करतोय बॉलीवूड अभिनेता, दोन मुलांचा बाबा झाल्यावरही केलं नाही लग्न, कारण सांगत म्हणाला…

रिद्धिमा पंडित ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री असून आजवर तिने अनेक मालिकांमध्ये व रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. ती काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. रिद्धिमा क्रिकेटपटू शुबमन गिलशी लग्न करणार असल्याच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. पण रिद्धिमाने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं. या मुलाखतीत तिला शुबमनसाठी एक हॅशटॅग विचारलं असता तिने ‘हार्टथ्रॉब’ असं म्हटलं.

Story img Loader