ऐश्वर्या नारकर या मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली नावाचं पात्र साकारत आहेत. ऐश्वर्या नारकर यांची मालिका खूप लोकप्रिय असून त्या साकारत असलेली भूमिकाही प्रेक्षकांना फार आवडते. आपल्या अभिनयाने घरोघरी पोहोचलेल्या ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. बऱ्याचदा त्या ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. काही वेळा त्या त्यांचे रोजचे व्यायामाचे रुटीन चाहत्यांबरोबर शेअर करतात. तर त्या त्वचा व केसांशी संबंधित टिप्स चाहत्यांना देत असतात. त्यांचे पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे डान्स व्हिडीओही खूप चर्चेत असतात. ४९ वर्षांच्या ऐश्वर्या खूपच उत्साही आहेत, त्यांचा उत्साह त्यांच्या रील्समध्ये पाहायला मिळतो.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल

दीपिका पादुकोण-रणवीर सिंहची संपत्ती आहे ७४५ कोटी रुपये, दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण? जाणून घ्या

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, यात त्या महिंद्रा थार चालवताना दिसत आहेत. ऐश्वर्या ही गाडी चालवत असताना शेजारी त्यांचे पती अविनाश नारकर बसलेले व्हिडीओत दिसत आहेत. त्यांनी थर थर ,,….”THAR” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘इगो’मुळे जूही चावलाने माधुरी दीक्षितबरोबर ‘तो’ सुपरहिट सिनेमा नाकारलेला; कबुली देत म्हणाली, “नेहमीच आमची…”

या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर एकदम डॅशिंग अंदाजात थार चालवताना दिसतात. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असून ते यावर कमेंट्स करत त्यांना दाद देत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यावर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केले आहेत. अनेकांना त्यांचा हा डॅशिंग अंदाज भावल्याचं दिसत आहे.

Video: ५६ वर्षांपूर्वीच्या आयकॉनिक गाण्यावर मुकेश व नीता अंबानींचा रोमँटिक अंदाज; नातवंडांसह व्हिंटेज कारमधून केली सफर

ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर हे दोघेही कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. खासकरून त्यांचे डान्स व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडतात. अनेक जुन्या गाण्यांवर हे दोघेही थिरकताना पाहायला मिळतात. काही वेळा त्यांचा मुलगा अमेय नारकरदेखील त्यांच्यासोबत असतो. बऱ्याचदा ऐश्वर्या नारकर त्यांच्या मालिकेच्या सेटवरून सहकलाकारांबरोबर मजेदार रील बनवून शेअर करत असतात. सेटवर होणारी धमाल, मस्ती त्या चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर करतात. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या यांचे लाखो चाहते आहेत.

Video: अमृता फडणवीस अन् लेक दिविजा सारखाच लूक करून पोहोचल्या अनंत-राधिकाच्या संगीतला, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

ऐश्वर्या नारकर या अनेकदा चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. काही वेळा त्यांना व अविनाश नारकरांना डान्समुळे ट्रोल केलं जातं, अशा ट्रोलर्सना ऐश्वर्या सडेतोड उत्तरं देत असतात.

Story img Loader