Alia Bhatt in Bigg Boss Marathi Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या शोचा टीआरपी इतका जबरदस्त आहे की बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट अन् अभिनेता वेदांग रैना ‘जिगरा’ चित्रपट प्रमोट करण्यासाठी या शोमध्ये पोहोचले. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या आलियाने या शोचं आणि रितेश देशमुखचं मराठीतून कौतुक केलं. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

कलर्स मराठीने आलियाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आलिया बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेत आल्यावर होस्ट रितेश देशमुख तिला तिची प्रतिक्रिया विचारतो. त्यावर आलिया म्हणते, “खूप चांगलं वाटतंय. जेव्हा आम्ही जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनचा प्लॅन करत होतो तेव्हा आमची मार्केटिंग टीम कुठे जायचं, काय करायचं याची चर्चा करत होती. जेव्हा आम्ही बिग बॉस मराठीचा टीआरपी ऐकला, तेव्हा आम्ही इथे यायचं ठरवलं,” असं आलिया म्हणाली.

हेही वाचा – Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live: वाचा अपडेट्स एका क्लिकवर

“बिग बॉस मराठी सध्या टॉपला आहे. यासाठी घरातील असलेल्या स्पर्धकांचं आणि बाहेर पडलेल्या स्पर्धकांचं अभिनंदन. चाहते आणि प्रेक्षकांकडून या शोला खूप प्रेम मिळत आहे आणि रितेश भाऊ…तुमची अँकरिंग.. तुमची अँकरिंग लय भारी आहे,” असं म्हणत आलियाने रितेश देखमुखचं कौतुक केलं. त्यावर रितेशने आलियाचे आभार मानले.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5: ९ लाख रुपये घेऊन खेळ सोडल्यावर जान्हवी किल्लेकरची पहिली पोस्ट, म्हणाली, “७० दिवसांच्या…”

या शोमध्ये नंतर ‘जिगरा’ सिनेमाचे दिग्दर्शक वासन बाला आणि अभिनेता वेदांग रैना आले. यावेळी वेदांगने मराठीत गाणंही गायलं. आलिया भट्ट या मंचावर असतानाच टॉप ३ पैकी टॉप २ स्पर्धक निवडण्यात आले. निक्की तांबोळी एलिमिनेट झाली आणि सूरज चव्हाण व अभिजीत सावंत हे दोघे टॉप २ स्पर्धक ठरले.