अभिनेता करणवीर बोहरा हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखला जातो. अनेक मालिकांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री पूनम पांडेही तिच्या वागण्या बोलण्याने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. या दोघांमध्ये चांगली मैत्री असून करणवीर आणि पूनम ‘लॉकअप’ शोमध्ये एकत्र दिसले होते. आता ही दोघं त्यांच्या कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Video: “मला वाईट वाटतंय आणि तू…”, किरण मानेच्या वागण्याने विकासला राग अनावर; मैत्रीत पडणार फुट

करण आणि बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे यांचा विरल भयानीने पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नुकतेच या दोघांना एअरपोर्टवर पाहण्यात आलं. यावेळी दोघांनी फोटोग्राफर्सना एकत्र पोझ दिल्या आणि तयांचयाबरोबर गप्पाही मारल्या. पण त्यानंतर करणवीरने जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. करणने पोझ देताना अचानक पूनमला उचलले आणि गरगर फिरवले. करणचे हे वागणे पूनमसाठीही अनपेक्षित होते. ती त्यावेळी थोडी अवघडली. करणचं हे वागणं पूनमला आवडलेलं दिसलं नाही. पूनमला उचलल्यावर करण पूनम पांडे पंखासारखी हलकी असल्याचंही म्हणाला.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप चर्चेत आला आहे. करणवीरच्या अशा वागण्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “करणला जरा जास्तच चढली आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “घरी गेल्यावर करणवीरला त्यांची बायको चांगलीच अद्दल घडवेल.”

हेही वाचा : Lock Upp : पूनम पांडेने पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर काढले कपडे, सगळ्यांसमोर केली अंघोळ

करणवीर बोहरा आणि पूनम पांडे दोघेही कंगना रणौतच्या वादग्रस्त शो ‘लॉकअप’मध्ये दिसले होते. शोमधून बाहेर पडल्यानंतरही या दोघांचे बाँडिंग किती मजबूत आहे, याचा अंदाज व्हायरल व्हिडीओवरून समोर आला आहे. तर करणवीर बोहरा तीन मुलींचा बाप आहे. अलीकडेच त्याच्या पत्नीने तिसऱ्या मुलीला जन्म दिला. त्यामुळेच करणवीरची ही स्टाईल पाहून चाहते हैराण झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of karanvir bohra and poonam pandey got viral on internet rnv