‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेद्वारे अभिनेत्री विदुला चौगुले घराघरांत पोहोचली. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्यापासून विदुला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या ती सगळ्या कामांमधून ब्रेक घेत केदारनाथला भगवान शिव शंकराचे दर्शन घेण्यासाठी गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “‘बाईपण भारी देवा’ हे नाव ६ अभिनेत्रींना आवडले नव्हते”, केदार शिंदेंनी केला खुलासा; म्हणाले, “वंदू मावशी मला थेट…”

केदारनाथच्या ट्रेकचे आणि मंदिर परिसरातील दर्शनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ विदुलाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. उत्तराखंडमध्ये तब्बल ३ हजार ५३८ मीटर उंचीवर असलेले ‘केदारनाथ’ हे भगवान शिवशंकराचे मंदिर आहे. या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकार, राजकीय नेतेही भगवान शंकराचे दर्शन करण्यासाठी केदारनाथ यात्रा करतात. विदुला सुद्धा जवळपास १६ ते १७ किलोमीटरचा ट्रेक करत मंदिरात पोहोचली. तिने या व्हिडीओला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चित्रपटातील ‘नमो नमो शंकरा’ हे गाणे जोडले आहे.

हेही वाचा : “जर हा प्रकल्प फसला…”, छत्रपती संभाजी महाराजांच्या कलाकृतीला माजी खासदाराने दिलेला नकार, अमोल कोल्हेंनी सांगितला अनुभव

विदुला चौगुलेने या व्हिडीओला “ज्याठिकाणी मनाच्या शांतीचा सुरु होतो…” असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर एका युजरने कमेंट करत “तुझ्यामुळे आम्हाला केदारनाथचे दर्शन झाले” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, इतर काही युजर्सनी या व्हिडीओवर “हर हर महादेव”, “जय भोलेनाथ” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “बायकोचा तुमच्यावर डॉक्टर म्हणून जास्त विश्वास आहे की राजकारणी म्हणून? अमोल कोल्हे म्हणाले “मी घरात …”

दरम्यान, ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत विदुलाने ‘सिद्धी’ हे पात्र साकारले होते. विदुलासह या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई प्रमुख भूमिकेत होता. इयत्ता दहावीत असताना विदुलाने या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती आणि पुढे तिची या भूमिकेसाठी निवड झाली. या मालिकेसह विदुलाने ‘बॉईज ३’ चित्रपटातही काम केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidula chougule visit kedarnath video goes viral on social media sva 00