मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’चे अनेक चाहते आहेत. केवळ मराठीच नाही तर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनीही त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. बॉलिवूडमध्येही या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन त्यापैकीच एक आहे. विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विद्या बालनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

‘चला हवा येऊ द्या’मधील भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यांच्यातील एक संवाद घेऊन विद्या बालनने भन्नाट रील व्हिडीओ बनवला आहे. विद्या बालनने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या संवादात निलेश साबळे भाऊ कदम यांना विचारतात, “एका व्यक्तीला शिंका येत असतील तर तुम्ही त्याला कोणतं औषध द्याल?” त्यावर भाऊ कदम म्हणतात, “मी त्याला आधी जुलाबाचं औषध देईन आणि मग सांगेन आता शिंकून दाखव.” भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यांच्यातील या विनोदी संभाषणावर विद्या बालनने परफेक्ट लिपसिंक केलं आहे.
आणखी वाचा- “८ वर्षांचा दुरावा अन्…” राधिका आपटेनं सांगितलं १० वर्षांनंतर कसं आहे वैवाहिक आयुष्य

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

विद्या बालनचा हा व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरूनही शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘चला हवा येऊ द्या’ मधील एका पंचवर विद्या बालन यांनी केलेलं एक धमाल रील’ याशिवाय विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री मृणाल ठाकूरने, “हाहाहा… किती क्यूट” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर अनेक सेलिब्रेटींनी यावर कमेंट्स केल्या आहे.

आणखी वाचा- “महेश भट्ट यांचा फोन आला आणि मी…” विद्या बालनने सांगितला तिच्या कारकीर्दीतला महत्त्वाचा किस्सा

दरम्यान विद्या बालनच्या कामाबद्दल बोलायचं तर ती ‘शेरनी’ पाठोपाठ ‘जलसा’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने एका पत्रकाराची भूमिका बजावली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री शेफाली शाहदेखील होती. यात या दोघींच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. विद्या सध्या अनू मेनन दिग्दर्शित ‘नियत’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.

Story img Loader