‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णीने ३ मे २०२२ रोजी अभिनेत्री शिवानी रांगोळबरोबर लग्नगाठ बांधली. विराजस-शिवानी त्यापूर्वी अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त विराजसने खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सून शिवानी रांगोळेच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णींची खास पोस्ट, मनातली इच्छा व्यक्त करत म्हणाल्या, “लवकर…”

अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात शिवानी, विराजस आणि मृणाल कुलकर्णींनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. चित्रपटात त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्या तरीही प्रमोशनदरम्यान त्यांच्यातील घट्ट नातं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आता विराजसने लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : हातात हात, खांद्यावर डोकं अन्…; आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडेचा ‘तो’ रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

विराजसने शिवानीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्नातील एक गोड Unseen फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराजस शिवानीला हसवत असल्याचं पाहायला मिळत आहे. “Happy Birthday बायको…आपल्यातील वेडेपणा आयुष्यभर असाच राहूदेत. लव्ह यू” असं कॅप्शन विराजसने या फोटोला दिलं आहे.

हेही वाचा : मास्तरीण बाईंचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव कसा? अधिपतीने सांगूनच टाकलं, शिवानीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत ऋषिकेश म्हणाला…

दरम्यान, विराजसप्रमाणे शिवानीच्या सासूबाई मृणाल कुलकर्णींनी सुनेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. याशिवाय तिचे मालिकेतील सहकलाकार ऋषिकेश शेलार, कविता मेढेकर यांनीही शिवानीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virajas kulkarni shared birthday wish post for wife shivani rangole sva 00