छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून विराजस कुलकर्णी ओळखले जाते. तो अभिनयाबरोबरच उत्तम दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जातो. विराजस कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने विराजसची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक खा व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवानी रांगोळेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केला आहे. यात तिने त्या दोघांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी त्या दोघांनी मिळून एक उखाणा बोलताना दिसत आहे. यावेळी सुरुवातीला शिवानी म्हणाली, खास मेजवानीचा शेवट केला खाऊन स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि आईस्क्रीम केक, खास मेजवानीचा शेवट केला खाऊन स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि आईस्क्रीम केक, शिवानीचं नाव घेतो आमचं काहीच नाही फेक, असे म्हणत विराजसने तिचा उखाणा पूर्ण केला.
आणखी वाचा : “विराजसशी लग्न झाल्यावर…” शिवानी रांगोळे सासूला कोणत्या नावाने हाक मारते? स्वत:च केला खुलासा
“विराजस कुलकर्णी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकमेकांची वाक्य पूर्ण करण्यापासून ते एकमेकांच्या जेवणाच्या थाळ्या संपवण्यापर्यंत…! अनाथेमा हे पहिले नाटक आणि व्हिक्टोरियाद्वारे दिग्दर्शनात केलेले पदार्पण. तुझ्या या प्रवासाचा एक भाग बनल्याबद्दल खूप आनंद आहे. हे तुझं वर्ष आहे. उत्तम राहा”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा : “…त्यादिवशीही मला शूटींगला आल्यासारखं वाटत होतं”, विराजसने सांगितला लग्नादरम्यानचा ‘तो’ किस्सा
या व्हिडीओत शिवानी ही विराजसकडे पाहत उखाणा घेताना दिसत आहे. त्यानंतर विराजसने हा उखाणा पूर्ण केल्यानंतर शिवानी ही लाजत हसताना दिसत आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान शिवानी रांगोळे ही लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रसारित होणार आहे. तर विराजस हा ‘सुभेदार’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.