‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात या मालिकेने चांगलीच बाजी मारली होती. यामध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अक्षरा-अधिपतीच्या जोडीने प्रेक्षकांची अल्पावधीतच पसंती मिळवली आहे. मालिकेत अक्षरा हे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. शिवानी ही मराठी मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात अभिनेता विराजस कुलकर्णीशी मे २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. शिवानी कायम नवरा विराजस आणि सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत असते. नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याला विराजस आणि मृणाल कुलकर्णींनी शिवानीचं कौतुक करण्यासाठी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : राहाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने शेअर केले Photos, म्हणाली, “छोटी वाघीण…”

Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”
Milind Gawali
“डब्यामध्ये तिळाचे लाडू होते आणि एक चिठ्ठी…”, प्रेमपत्राचा किस्सा सांगत मिलिंद गवळी म्हणाले, “ती चिठ्ठी आईला…”
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”

विराजय आणि मृणाल कुलकर्णी यांनी ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मीडियाशी संवाद साधला. यावेळी दोघांनाही शिवानीबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. “अक्षरा-अधिपतीची जोडी आता छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय झाली आहे त्यामुळे शिवानीचे ऑनस्क्रीन लग्नाचे सीन्स पाहताना मनात काही जाणवतं का?” असा प्रश्न विराजसला लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “आम्ही दोघंही मी आणि शिवानी गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आम्ही केल्या आहेत. एका मीच लिहिलेल्या नाटकामध्ये मी तिचा मानलेला भाऊ होतो. हा आमच्या कामाचा एक भाग आहे.”

विराजस कुलकर्णी पुढे म्हणाला, “मी जेव्हा ‘माझा होशील ना’ ही मालिका करायचो तेव्हा तिला काहीच नाही वाटायचं अगदी तसंच आता आहे…त्यापलीकडे जाऊन मी ऋषिकेशला (अधिपती) खूप पूर्वीपासून ओळखतो. त्यामुळे एक चाहता म्हणून मी त्यांची मालिका पहिल्या दिवसापासून पाहत आलो आहे. अक्षरा-अधिपती एवढे खरे वाटतात की, आपली बायको फारच वेगळी आहे हे पटकन कळून येतं. ते दोघं खरंच खूप चांगलं काम करत आहेत.”

हेही वाचा : Video: शुबमन गिल-सारा तेंडुलकरच्या डेटिंगवर सारा अली खानने केलं शिक्कामोर्तब? ‘त्या’ प्रश्नावर म्हणाली, “संपूर्ण जग…”

दरम्यान, यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात शिवानी रांगोळेला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चेहरा, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. तीन पुरस्कार मिळवल्यामुळे मृणाल कुलकर्णींनी लाडक्या सुनेचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली होती.

Story img Loader