रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची चाहत्यांमध्ये आजही तेवढीच क्रेझ आहे. आजही देशभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. एकेकाळी अशी वेळ होती त्यांच्या या भूमिकेमुळे देशभरात कुठेही गेल्यावर लोक त्यांना नमस्कार करत असत. आजही अनेकदा असं घडतं हे नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे लक्षात आलं. नुकतेच अरुण गोविल एअरपोर्टवर दिसले. यावेळचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अरुण गोविल एअरपोर्टवरून बाहेर पडत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात एक महिला अक्षरशः त्यांच्या पायावर डोक ठेवून त्यांना नमस्कार करताना दिसत आहे. भगव्या रंगाच्या साडीतील एक महिला अरुण गोविला यांना भेटायला आली होती आणि तिने एक शालही आली होती जी अरुण गोविल यांनी पुन्हा तिला दिली. ही महिला त्याच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करतेय आणि बरेचदा सांगूनही तिथून उठताना दिसत नाहीये.
आणखी वाचा- Video: जपानी दिग्दर्शकाला रामायणाची भुरळ; ‘Breaking Bad’ च्या ‘या’ स्टारने दिला श्रीरामांचा आवाज
आयएएस सुमिता मिश्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अरुण गोविल स्वतःची ट्रॅव्हलर बॅग घेऊन एअरपोर्टच्या बाहेर निघताना दिसत आहेत. तर समोर त्यांचे चाहते त्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना सुमिता यांनी लिहिलं, “तुमची लोकांच्या मनातील प्रतिमा हिच तुमची महानता आहे.”
आणखी वाचा- ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी खरेदी केली लग्झरी कार, चाहते म्हणाले “प्रभु कैसा वाहन ले आए”
सुमिता यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “रामायण मालिकेला ३५ वर्षे होऊन गेली पण रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आजही सर्वांसाठी प्रभू श्रीरामच आहेत. हा भावुक करणारा क्षण होता.” हा व्हिडीओ अरुण गोविल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही शेअर केला आहे. व्हिडीओमधील महिला अरुण गोविल यांना पाहून खूपच भावुक झालेली दिसत आहे.