Vishakha Subhedar : मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा घराघरांत उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा विनोदी कार्यक्रमांतून विशाखाने रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कलाविश्वात काम करताना कुटुंबीयांची सुद्धा साथ महत्त्वाची असते. विशाखाला या सगळ्या प्रवासात तिच्या पतीने खंबीरपणे पाठिंबा दिला.

विशाखा सुभेदारचं माहेरचं नाव आडनाव शिंदे आणि लग्नानंतर ती सुभेदार झाली. १९९८ मध्ये अभिनेत्रीने महेश सुभेदार यांच्याशी लग्न केलं. खरंतर, लग्नानंतरच तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली आणि यानंतर विशाखाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिचे पती महेश हे सुद्धा अभिनेते म्हणून ओळखले जातात. सध्या विशाखा ‘शुभविवाह’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. पत्नी मालिकाविश्व गाजवत असताना, आता तिचे पती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासंदर्भात महेश सुभेदार यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा : विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हाती सोपवली नव्या गाडीची किल्ली; किंमत ऐकून थक्क व्हाल…

“पुनःश्च हरिओम… पुन्हा एकदा आज मालिकेचं शूटिंग करतोय… मध्यंतरी थोडा ब्रेक घेतला. पण, स्वामी कृपेने परत आज कामाला लागलोय. स्वामी अशीच कामे चालू राहू दे आणि नटेश्वराची सेवा करण्याची संधी मिळत राहो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना…” अशी पोस्ट शेअर करत महेश सुभेदार यांनी ते पुनरागमन करत असल्याचं सांगितलं आहे.

आपला नवरा पुनरागमन करतोय म्हटल्यावर विशाखा सुभेदारने ( Vishakha Subhedar ) सुद्धा खास पोस्ट शेअर करत महेश यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विशाखा सुभेदारची पतीसाठी पोस्ट

मस्तच… महेश…!
खरंतर, तुझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. मी खूप धावपळीत असताना, तुला मात्र तुझ्या कामांमध्ये खूप सांभाळून तारेवरची कसरत करत काम करायला लागतं. गेली अनेक वर्ष घर, त्यातल्या अनेक जबाबदाऱ्या तू सांभाळतोयस. माझी काळजी घेणारा डॉक्टर, बँक, सोसायटी ते नात्यांचा मेंटेनन्स सगळं सगळं तू सांभाळतोयस. माझ्य मागे खंबीरपणे उभा आहेस. कुठलीही अडचण आली की, माझा तुला फोन असतो. फक्त माझंच कशाला… अगदी अनेक जणांचा..
पोरासाठी सुद्धा अनेकदा तूच असायचा आणि आहेस. आईला सुद्धा तूच सांभाळतोयस. यात तुझी कुठलीही तक्रार नसते, सगळं आनंदाने… मेहनत कष्ट माझ्यापेक्षा जास्त तू करतोस. अनेक गोष्टी एकावेळी करण अवघड असतं. त्यातून तुला काम करताना पाहताना आनंद होतोय. लगे रहो नवरोबा… आणि तू बरोबर होतास आहेस म्हणून मी आहे.

Vishakha Subhedar Husband
विशाखा सुभेदारची पतीसाठी पोस्ट ( Vishakha Subhedar Husband Comeback on Television )

दरम्यान, विशाखा सुभेदारच्या ( Vishakha Subhedar ) पोस्टवर नेटकऱ्यांसह तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत महेश सुभेदार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader