मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ती घराघरात पोहचली. अभिनयाबरोबच विनोदाचं अचूक टायमिंग साधत विशाखाने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. मात्र, अभिनयाचा हा प्रवास विशाखासाठी सोप्पा नव्हता. अनेक अडचणींचा विशाखाला सामना करावा लागला आहे. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत विशाखाने लग्नानंतरच्या तिच्या दिवाळी पाडव्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “खरं तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील…”, प्राजक्ता माळीने सांगितले संघाच्या दसरा मेळाव्याला जाण्याचे कारण, म्हणाली…

विशाखा म्हणाली, “गेल्या अनेक वर्षात मला हवी तशी दिवाळी साजरी करता आली नाही. पहिल्या पाडव्याला मला माझ्या नवऱ्याने एक ड्रेस घेतला होता. काही वर्ष छान झाला पाडवा. नवीन लग्न झाल्यानंतर नणदांसाठी जास्त भेटवस्तू दिल्या देत होते त्यामुळे माझे अनेक पाडवे सूनेच गेले आहेत मला वाटायचं हे सगळं कऱण्यातच आपला पाडवा आहे. एका पाडव्याला माझ्या नवऱ्याने मला सोन्याचे कानातले घेतले होते. त्यामुळे काही पाडवे माझ्या चांगलेच लक्षात आहेत. शेवटी खिसा, दिवाळी आणि दिवाळं निघणं हे गणित होतं नेहमीच. पण आता पाडवा म्हणलं तर नवऱ्याला आडवा पाडायचं आणि त्याचा खिसा रिकामा करायचा हे आहेच.”

विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर २४ नोव्हेंबरला तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद खांडेकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. विशाखा सुभेदारबरोबर गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, यांची मुख्य भूमिका आहे.