Vishakha Subhedar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फुबाईफू’ या छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमांतून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरांत लोकप्रिय झाली. विनोदाचं अचून टायमिंग साधत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर विशाखाने आजवर लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिका, चित्रपट, विनोदी कार्यक्रम अशा सगळ्या माध्यमांवर तिने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गेले दहा दिवस संपूर्ण देशभरात गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं वातावरण होतं. सामान्य लोकांप्रमाणे मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालं होतं. तर, काही कलाकारांनी मोठमोठ्या गणेशमंडळांना भेटी दिल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. याशिवाय बहुतांश मराठी कलाकारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदारचा ( Vishakha Subhedar ) देखील समावेश होता. अभिनेत्रीने तिच्या अन्य कलाकार मित्रमंडळींसह नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उपस्थिती लावली होती. अभिनेत्रीने यावेळच्या भेटीचा अनुभव इन्स्टाग्राम पोस्ट करत शेअर केला आहे.

हेही वाचा : “ऐश्वर्या त्याच्या जिममध्ये येऊ लागली अन्…”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा; सोमी म्हणाली, “मला माहीत होतं की…”

vishakha subhedar
अभिनेत्री विशाखा सुभेदार ( Vishakha Subhedar )

अभिनेत्री विशाखा सुभेदारची पोस्ट

विशाखा सुभेदार ( Vishakha Subhedar ) लिहिते, “यावर्षी सुद्धा वर्षा बंगल्यावरून आमंत्रण आलं. बाप्पाचं दर्शन, आरती आणि प्रसाद…. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री जबरदस्त व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे… आणि जातीने सगळ्यांची चौकशी करत असणारे श्रीकांत शिंदे आणि वहिनीसाहेब. आरतीसाठी साहेबांनी स्वतः टाळ घातला गळ्यात… किती साधे आणि प्रेमळ व्यक्तिमत्व..! का माहीत नाही पण, खूप वर्षांआधी, अगदी कळव्यात माहेरी असल्यापासूनच हे नाव जवळच वाटायचं.. कारण माहेरची मी शिंदे आहे त्यामुळे… माझं सगळं बालपण ठाणे – कळवा इथे गेलं आणि शिंदे साहेबांची कर्मभूमी सुद्धा ठाणे जिल्हा आहे त्यामुळे असेल हे..! आज ‘वर्षा’स्थानी जायला मिळालं याचा आनंद आहे… बाप्पाचं दर्शन झालं”

हेही वाचा : “तुझ्यासारखं व्यक्त होता येत नसलं तरी…”, प्रिया बापटच्या वाढदिवशी पती उमेशची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला…

विशाखा सुभेदारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे आणि त्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाची आरती केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या ( Vishakha Subhedar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘शुभविवाह’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं नाव रागिणी असं आहे.