बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सध्या बराच गाजतोय. सुरुवातीपसूनच वर्चस्व गाजवणाऱ्या अपूर्वा नेमळेकरला आजकाल राखी सावंत जोरदार टक्कर देताना दिसत आहे. मागच्या आठड्यात बिग बॉस मराठीच्या घरात चार चॅलेंजर्सची एंट्री झाली होती. ज्यात आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, विशाल निकम आणि राखी सावंत यांचा समावेश होता. या चौघांनी मागचा संपूर्ण आठवडा गाजवला. पण आठवड्याअखेर मीरा आणि विशाल घरातून बाहेर पडले.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमने मीरा जगन्नाथसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे मीरा आणि विशाल या आधी तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाले होते आणि त्यावेळी त्यांच्या फार काही बाँडिंग पाहायला मिळालं नव्हतं. बरेचदा त्यांच्यात वाद झाले होते. पण यावेळी मात्र फारच वेगळं चित्र पाहायला मिळालं.
आणखी वाचा- “मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत
मीरा जगन्नाथबरोबरचा फोटो शेअर करत विशालने आता जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या मैत्रीवरही भाष्य केलं आहे. त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “लास्ट सीझनमधील अनुभव पाहता आपली मैत्री इतकी खास होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपल्या सीझनमध्ये आपण एकमेकांच्या विरोधात उभे होतो, कचाकचा भांडत होतो. पण हा सीझन कमालीचा वेगळा ठरला. बिग बॉस चारच्या घरातली आपली एंट्री झाली तेव्हा, तुझं असणं मला आधार वाटून गेलं. माझ्या कुटुंबातली एक सदस्य माझ्यासोबत आल्याचे समाधान मिळाले.”
आणखी वाचा- “हळद लागली, हळद लागली…”, विशाल निकमची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान मीरा जगन्नाथने तिसरा सीझन गाजवला होता. तर विशाल निकम त्या सीझनचा विजेता ठरला होता. त्यानंतर यावेळी बिग बॉसच्या घरात या दोघांनी चॅलेंजर्स म्हणून एंट्री केली होती. पण हे दोघं शोमध्ये फक्त एकच आठवड्यासाठी होते. पण त्या कालावधीत दोघांमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळाली. लवकरच मीरा जगन्नाथ ‘ ठरलं तर मग ‘ या मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसणार आहे.