लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहियाची सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्री सध्या टीव्हीवर कोणत्याही मालिकेत काम करत नाहीये, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. दिव्यांकाने विवेक दहियाशी लग्न केलंय. हे दोघेही लवकरच पालक होणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून होत्या. आता विवेकने त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Video: प्रियांका चोप्राचा तोल बिघडला अन् निकने केलं असं काही…, ‘तो’ व्हिडीओ पाहून तुम्ही कराल कौतुक
विवेक दहियाने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना सांगितले की, त्याची पत्नी दिव्यांका त्रिपाठी गर्भवती नाही. अशी आनंदाची बातमी असेल तर आम्ही चाहत्यांना नक्कीच सांगू. विवेक म्हणाला, “मला समजत नाही की हे आमच्यासोबत का होत आहे. अनेकदा इंटरनेटवर याबद्दल बोललं जातं. पण हे खरं नाही. दिव्यांका गरोदर नाही. जेव्हा खरोखर आनंदाची बातमी असेल, तेव्हा आम्ही स्वतःच चाहत्यांना सांगू.”
‘ये है मोहब्बतें’च्या सेटवर दिव्यांका आणि विवेकची प्रेमकहाणी सुरू झाली. तिथेच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. २०१६ मध्ये दिव्यांकाने विवेकशी भोपाळमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट काळाबद्दल सांगत असतात.