Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील लाडका सदस्य म्हणजे विवियन डिसेना. हे पर्व सुरू होताच विवियन डिसेनाला लाडका सदस्य आणि टॉप-२ मधील सदस्य असल्याचं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं होतं. ‘बिग बॉस’चा हा निर्णय बऱ्याच सदस्यांना खटकला. पण, आता विवियन ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात टॉप-२ पर्यंत पोहोचतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आता ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात फॅमिली वीक सुरू झाला आहे. त्यामुळे आता सदस्यांच्या कुटुंबातील मंडळींची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री झाली आहे. याचे प्रोमो ‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. विवियन डिसेना भेटण्यासाठी त्याची पत्नी नूरन अली आली असून दोघांच्या रोमँटिक प्रोमोने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Bigg Boss 18 Shilpa Shirodkar emotional after met daughter watch promo
Bigg Boss 18: ८६ दिवसांनंतर लेकीला पाहून शिल्पा शिरोडकर ढसाढसा रडली, किस करताच अनुष्का मराठीत म्हणाली, “मी मेकअप लावलाय…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vivian Dsena ex wife Vahbbiz Dorabjee left Deewaniyat Serial
Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, ७ वर्षांनी केलेलं पुनरागमन; नेमकं काय घडलं?
Tula Shikvin Changalach Dhada New Promo
भुवनेश्वरीला कळणार अक्षराचं मोठं गुपित! सुनेबद्दलची ‘ती’ बातमी ऐकून सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार…; पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Jahnavi Killekar
Video : माहेरी गेलेल्या जान्हवी किल्लेकरचं घरी ‘असं’ झालं स्वागत; तिच्या मुलाच्या कृतीनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “सोपं नाही महाराष्ट्राला…”
Vaibhav Chavan And Irina Rudakova
“ते अरबाज आणि निक्कीपेक्षा…”, वैभव आणि इरिनाच्या रोमँटिक व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “यंदा उरकून टाका…”

हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला कधीच माफ करणार नाही…”, चाहत पांडेची आई अविनाश मिश्रावर भडकली, ‘स्त्रीलंपट’चा टॅग देत म्हणाली…

या प्रोमोमध्ये सुरुवातीला विवियनची पत्नी नूरन अलीची एन्ट्री पाहायला मिळत आहे. त्यानंतर नूरन विवियनला शोधत गार्डन एरियामध्ये जाते. यावेळी विवियन स्विमिंग पूलच्या बाजूला झोपलेला असतो. नूरन विवियनजवळ जाते आणि म्हणते, “आय लव्ह यू…मला तुझा खूप अभिमान आहे.” त्यानंतर विवियनला अश्रू अनावर होतात. नूरन त्याचे डोळे पुसून डोक्यावर किस घेते. मग विवियन म्हणतो, “बिग बॉस मला रिलीज करा. तुमची सून आली आहे.” त्यानंतर बिग बॉस रिलीज करताच विवियन नूरनला जोरात मिठी मारतो. दोघांचा हा रोमँटिक प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’मधील गाण्यावर डान्स करत ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी नवीन वर्षाचं केलं स्वागत, शुभेच्छा देत अभिनेत्री म्हणाल्या…

विवियन डिसेना आणि नूरन अलीच्या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली निक्की तांबोळी म्हणाली, “एक नंबर”. तसंच “विवियन रडल्यानंतर मलाही रडायला आलं”, “या एपिसोडची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. विवियन पहिल्यांदा शोमध्ये रडला आहे”, “दोघं किती छान दिसत आहेत”, अशा प्रकारच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

निक्की तांबोळीची प्रतिक्रिया
निक्की तांबोळीची प्रतिक्रिया

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात आले ज्योतिषी, सदस्यांना दिली हटके नावं, वाचा टॉप-१०ची भविष्यवाणी

दरम्यान, याआधीही नूरन अली ‘बिग बॉस’मध्ये आली होती. काही वेळासाठी नूरनने येऊन विवियनला सल्ला दिला होता. तेव्हा तिने विवियनला स्वतःसाठी खेळण्याचा सल्ला देत करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर हे खरे मित्र नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून विवियनने खेळण्याची स्ट्रॅटजी बदलली.

Story img Loader