अभिनेता करणवीर मेहरा ‘बिग बॉस १८’ चा विजेता ठरला आहे. अभिनेता विवियन डिसेनाला हरवून करणवीर मेहराने हा शो जिंकला. कलर्सचा लाडका विवियनने करणवीर ट्रॉफी जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉसची ट्रॉफी न जिंकू शकल्याबद्दल विवियन काय म्हणाला ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवियन डिसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ट्रॉफी मिळू शकली नाही, याबद्दल वाईट वाटत नसल्याचं विवियनने म्हटलं आहे. “मी नशिबावर विश्वास ठेवणारा आहे. करिअर अचिव्हमेंटबद्दल तक्रार असलेला मी कदाचित शेवटचा माणूस असेल. आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ते आपल्याला आता समजत नाही, पण नंतर समजतं. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला पाहिजे. लोकांनी खूप प्रेम दिलंय, कुटुंबियांनी खूप प्रेम दिलंय. इंडस्ट्रीतील अनेकांनी पाठिंबा दिला, त्यापैकी काही जणांना तर कदाचित मी भेटलोही नसेन. इतका पाठिंबा जनतेकडून मिळाला,” असं विवियन म्हणाला.

करणवीरबद्दल विवियन म्हणाला, “माझा नशिबावर विश्वास आहे. माझ्या नशिबात ट्रॉफी नव्हती, त्याच्या नशिबात होती, तर त्याला मिळाली. माझ्या नशिबात लोकांचं प्रेम लिहिलं होतं, तर ते मला मिळालं.”

पाहा व्हिडीओ –

१५ आठवड्यांच्या प्रवासानंतर करणवीर मेहराने ही बिग बॉसच्या १८ व्या पर्वाची ट्रॉफी जिंकली. करणने या प्रवासात प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. अनेकांशी त्याची घरात भांडणं झाली. त्याची शिल्पा शिरोडकर व चुम दरांगबरोबरची मैत्री चर्चेचा विषय ठरली. मुख्य म्हणजे करण हा शो जिंकला तेव्हा चुम व शिल्पा वगळला इतर कोणत्याच स्पर्धकाने करणचं अभिनंदन केलं नाही. त्यांना विवियन जिंकावा असं वाटत होतं. जनतेच्या मतांनुसार करण जिंकला असला तरी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा व ईशा सिंह हे बिग बॉस १८ चे टॉप सहा सदस्य होते. या सहापैकी सर्वात आधी ईशा सिंह विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाली. त्यानंतर चुम दरांग व अविनाश मिश्रा बिग बॉसच्या घराबाहेर पडले. तिसऱ्या क्रमांकावर रजत दलाल बाद झाला, त्यानंतर विवियन डिसेना व करणवीर मेहरा हे टॉप २ सदस्य होते. अखेर करणवीर विजेता असल्याची घोषणा होस्ट सलमान खानने केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivian dsena first reaction after karan veer mehra won bigg boss 18 trophy hrc