Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातला दुसरा कॅप्टन म्हणजेच ‘टाइम गॉड’ विवियन डिसेना झाला आहे. यासाठी ‘बिग बॉस’ने एक टास्क दिला होता. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेनामध्ये या दोघांमध्ये हा टास्क रंगला. यावेळी घरातील सर्व सदस्यांच्या सहमतीने विवियन डिसेनाला ‘टाइम गॉड’ करण्यात आलं. पण, ‘टाइम गॉड’ होताच विवियन डिसेनाचं रुप बदलेलं दिसत आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे; ज्यामध्ये विवियन श्रुतिका अर्जुनला साफसफाई नीट न केल्यामुळे टोकताना दिसत आहे.

‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस १८’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये विवियन श्रुतिकाला बोलावताना दिसत आहे. त्यानंतर श्रुतिकाला अस्वच्छ असलेलं किचन दाखवतो. तेव्हा श्रुतिका म्हणते, “मी पूर्ण साफ केलं होतं. त्यानंतर हे पुन्हा केलं गेलं आहे. प्रत्येक बाजूला बघ मी सर्व स्वच्छ केलं आहे. यासाठी अविनाश साक्षीदार आहे.” मग विवियन किचनच्या एका कोपऱ्यात जातो आणि श्रुतिकाला धूळ दाखवतो. हातात धूळ घेऊन म्हणतो, “तुमच्याकडे याला चुमा म्हणतात? पण आमच्याकडे याला धूळ म्हणतात.”

हेही वाचा – “फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”

पुढे किचनवर असलेला विवियनच्या कपविषयी श्रुतिका विचारते, “हा व्ही वाला कप इथे असणार का?” तेव्हा विवियन म्हणतो, “हां.” त्यानंतर श्रुतिका म्हणते, “हा व्ही वाला कप इथे असाच पडून होता.” हे पाहून विवियन स्वतःचा कप अविनाशकडे धुवायला देतो आणि म्हणतो की, हा कप धू. कोणाला हात लावायला देऊ नको. कोणी हात लावला तर पुन्हा धुवून ठेव. कारण मला माझ्या वस्तूंना हात लावलेलं आवडत नाही. त्यानंतर श्रुतिका म्हणते, “सगळेजण प्रत्येक भांड्याला हात लावूनच जेवण बनवत आहेत, भांडी घासत आहेत. मग तू नको खाऊ.” तेव्हा विवियन म्हणतो, “तुला काम करायचं आहे की नाही.” त्यामुळे आता विवियन आणि श्रुतिकामधले वाद वाढताना दिसत आहेत.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणच्या घरी पोहोचला अभिजीत सावंत, पत्नी शिल्पा सावंत फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा – “नकोच तो अंधार…”, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, म्हणाला, “आजूबाजूच्या गोंगाटात…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या चौथ्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक, श्रुतिका अर्जुन, अरफीन खान, शिल्पा शिरोडकर आणि शहजादा या सदस्यांना बहुमताने नॉमिनेट केलं आहे. आता या सदस्यांपैकी कोण घराबाहेर होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.