मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. त्याला विनोदवीर म्हटलं जातं. पण, पृथ्वीक स्वतःला विनोदवीर म्हणत नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील सगळे कलाकार विनोदवीर नाहीयेत, त्यांना विनोदवीर असा लेबल लावणं योग्य नाही, असं मत पृथ्वीकने व्यक्त केलं.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी पृथ्वीक प्रतापला किती मानधन मिळतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

पृथ्वीक म्हणाला, “बॅनर छापताना आम्हाला विनोदवीर म्हटलं जातं, पण आम्ही विनोदवीर नाही. आम्ही अभिनेते आहोत जे खूप चांगले विनोद करू शकतात, जे इमोशनल भूमिका करू शकतात, जे गंभीर व नकारात्मकही भूमिका करू शकतात. पण हा फरक लोकांना कळणं कठीण आहे, कारण आपण ते कधीच लोकांमध्ये बिंबवलं नाहीये. आपण एखादी गोष्ट सांगत राहतो आणि मग तेच लोक बोलतात.”

हेही वाचा – आडनाव का लावत नाहीस? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितली दोन कारणं; म्हणाला, “आडनाव पाहून…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील आपल्या ‘शंकऱ्या’ या पात्राचा उल्लेख करत पृथ्वीक म्हणाला, “मी माझ्या पात्रांत कधीच कॉमेडी केली नाही. शंकऱ्या शितलीच्या प्रेमात आहे, तो हसतो-बोलतो. तो जेव्हा शिवालीला काहीतरी बोलतो, तेव्हा तो विनोदी वाटतो, पण तो विनोद नसतो, तो त्याच्या भावना व्यक्त करत असतो. खरं तर तिथे कॉमेडी करण्याची गरज नाही, पण ती सिच्युएशन इतकी खरी करावी लागते की अभिनेता म्हणून तो लोकांना अपील होतो. “

“सतत विनोद करायचे असतील, तर त्यासाठी तशा भूमिका कराव्या लागतील. ज्यात लेखकांना पंच लिहावेच लागतील. तुम्ही कॉमेडी करावीच असं नाही. फक्त तुम्हाला हुशारीने इथे मला अभिनय करायचाय किंवा इथे मला सिरीअस कॅरेक्टर करायचंय, मला माझं म्हणणं लोकांवर बिंबवायचं आहे हे कळलं की लोक तुम्हाला अभिनेता समजतात,” असंही पृथ्वीक प्रताप म्हणाला.

Story img Loader