‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काही दिवसांपूर्वी मोठा बदल झाला. अचानक अभिनेत्री तेजश्री प्रधानची मालिकेतून एक्झिट झाली. त्यामुळे सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. पण, अजूनही प्रेक्षकांनी स्वरदाला मुक्ता म्हणून स्वीकारलं नसल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा २ फेब्रुवारीला महाएपिसोड रंगणार आहे. या महाएपिसोडचा प्रोमो अलीकडेच ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये सावनीचं नवं कारस्थान पाहायला मिळत आहे. आदित्यच्या कस्टडीच्या बदल्यात सावनी सईला घेऊन जाताना दिसत आहे. पण, यावेळी सई सावनीच्या हाताला चावते आणि मुक्ताकडे धावत येऊन तिला मिठी मारते. तेव्हा मुक्ता म्हणते, “हा एक कागदाचा तुकडा माझ्या या काळजाच्या तुकड्याला कधीच दूर करू शकणार नाही.” त्यानंतर मुक्ता सईला घट्ट मिठी मारताना पाहायला मिळत आहे. याचा प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी “जुनी मुक्ता पाहिजे”, “तेजश्री प्रधानची जागा कोणीच घेऊ शकत नाही”, “तेजश्री असती तर खूप छान झालं असतं”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “या सीनमध्ये तेजश्री असती तर हा सीन किती भावनिक झाला असता. यात काहीच भावना नाहीयेत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, ही मुक्ता आल्यापासून मालिकेत भावना दिसत नाहीयेत. जे आधी होतं. आधीची मुक्ता फक्त सई माऊ म्हणाली तरी वेगळं वाटतायचं. पण हीच तसं काहीच वाटतं नाही. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ही नवी मुक्ता ना सागरबरोबर चांगली दिसत, ना सईबरोबर चांगली दिसत. बाकी सगळे जाऊ देत. तिच्या जागेवर जुनी मुक्ता असती तर खूप छान झालं असतं. तिचे प्रोमो पाहून डोळ्यात पाणी यायचं जे हिला बघून अजिबात येत नाही.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तेजश्री प्रधानसारखा अभिनय करायला स्वरदाला १ टक्के जमत नाही. म्हणूनच आम्हाला तिचं मुक्ता पाहिजे आहे. नवीन नको. परत आणा त्याच मुक्ताला प्लीज लवकरात लवकर. अशा बऱ्याच प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, स्वरदा ठिगळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिने ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केलं. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकेत झळकली. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We want old mukta says netizens on premachi goshta maha episode promo pps