सध्या एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या कुटुंबियांसह रिक्षामध्ये बसलेली दिसत आहे. हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री एका एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते आणि ती चक्क रिक्षातून प्रवास करताना दिसल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनुपामा फेम रुपाली गांगुली आहे.

आणखी वाचा : अजय देवगणचा ‘थँक गॉड’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली हिने ‘अनुपमा’मधील तिच्या व्यक्तिरेखेने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोच्या एका एपिसोडसाठी अनुपनाला भरघोस फी मिळते. तर तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.

रुपाली गांगुलीचा एक फोटो समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर रुपालीला सामान्य जीवनशैली किती आवडते हे स्पष्ट झाले आहे. या फोटोत ती आपल्या कुटुंबासह ऑटो रिक्षा प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहे.

रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या कुटुंबियांसह रिक्षा प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट शेअर करताना रुपालीने लिहिले की, “कुटुंबासाह रिक्षा प्रवास. रुद्रांश आणि मी रिक्षाचे मोठे चाहते आहोत आणि त्यासाठी आम्ही कार सोडली आहे.”

हेही वाचा : ‘अनुपमा’ मालिकेमध्ये होणार सुप्रिया पिळगावकर यांची एंट्री? साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका

रुपालीने ‘परवरिश’ आणि ‘कुछ खट्टा काही मीठे’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘अनुपमा’ या अत्यंत गाजत असलेल्या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. तिने २०१३ मध्ये बिझनेसमन अश्विन वर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी रुपालीने तिचा मुलगा रुद्रांशला जन्म दिला.

Story img Loader