Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मालिकेतील सर्व कलाकारांनी आपल्या पात्राला पूर्णत: न्याय दिला आहे. दमदार स्टारकास्ट असल्यानेच या मालिकेवर तब्बल पाच वर्षे प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. आता ‘आई कुठे करते’ मालिका लवकच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका बंद होणार असल्याने यातील सर्वच कलाकार भावूक झाले आहेत. त्यात आता सोशल मीडियावर आई हे पात्र साकारणाऱ्या अर्चना पाटकरांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेने त्यांना काय दिले, याची त्यांनी माहिती सांगितली आहे.
प्रत्येक घरात सासू आणि सूनेची भांडणं कायम ठरलेली असतात. मालिकांसह घराघरात ही भांडणं पाहायला मिळतात. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सासूचं म्हणजेच कांचन देशमुख हे पात्र अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारलं आहे. या मालिकेत त्यांनी वृद्ध आजी आणि आंबट, गोड तर कधी तिखट अशा सासूची भूमिका उत्तम निभावली आहे. मालिकेत त्या स्वत: एक सासू आणि आईदेखील दाखवण्यात आल्या आहेत, त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने त्यांना काय दिलं, याचीच माहिती जाणून घेऊ.
हेही वाचा : मलायका अरोरा रात्री उशिरा पार्टीतून बाहेर पडली, भररस्त्यात घसरला पाय अन्…; पाहा व्हिडीओ
कांचन आजी सांगतात की, आई कुठे काय करते’ या मालिकेने मला नवीन घर दिलं, नवीन नाती दिली. वेळप्रसंगी सासू सूनेची आई झाली; तर सून सासूची आईदेखील झाली. या नात्यात सासू सूनेचं नातं नव्याने उलगडलं, सर्व काही नव्याने शिकवलं, नव्याने समजलं. त्यामुळे आता पाहूयात याच नात्यांचे काही अंतिम क्षण. बघूया ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या निरोपाचे अंतिम भाग.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारी २.३० वाजता लागते. मालिका निरोप घेत असल्याने अनेक चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काहींनी मालिकेचं आणि येथील सर्वच कलाकारांचं भरभरून कौतुक केलं आहे. कांचन आजी घरातील सर्वात मोठ्या स्त्री होत्या, त्यामुळे मालिकेत प्रत्येक सण साजरा होताना त्या या सणांची माहिती द्यायच्या. त्यांच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे, “आजी तुम्ही आम्हाला प्रत्येक सणाची माहिती सांगितली”, ही माहिती आम्ही खूप मिस करू.
हेही वाचा : सागर बहिणीसाठी नवरा विकत घेणार? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा नवीन प्रोमो
“मालिका संपल्यावर आम्हाला कांचन आजी आणि अप्पांची सर्वात जास्त आठवण येणार आहे, कारण हे दोघे दररोज भांडण करायचे आणि त्यातून मजेशीर जोक तयार व्हायचे. दोघांमधील गमतीदार संवाद आम्हाला रोज ऐकावा वाटतो. आम्ही हा संवाद आणि भांडणं फार मिस करू”, असंसुद्धा एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे.