सध्या ‘झी मराठी’वरील नव्या मालिकांची चांगलीच चर्चा सुरू आहे. काल, १४ जानेवारीला ‘शिवा’ या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला. या प्रोमोमधून अन्यायाशी लढणाऱ्या शिवाची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली. त्यामुळे ‘शिवा’च्या नव्या प्रोमोची चांगलीच चर्चा रंगली आहे. काही जणांना ‘झी मराठी’च्या या नव्या मालिकेचा प्रोमो पसंतीस पडला आहे. तर काही जणांना खटकला आहे. त्यामुळे मालिका सुरू होण्यापूर्वीच बंद कधी होणार? अशी विचारणा केली जात आहे. शिवाय या नव्या मालिकेत खासदार डॉ. अमोल कोल्हे आहेत का?, असं विचारलं जात आहे? पण खासदार अमोल कोल्हेंचा ‘शिवा’ मालिकेशी काय संबंध? नेटकरी असं का विचारतात? जाणून घ्या…

‘शिवा’ या नव्या मालिकेची घोषणा डिसेंबर २०२३मध्ये झाली होती. मग या नव्या मालिकेतील नायिकेची ओळख एका जबरदस्त प्रोमोमधून करण्यात आली होती. अभिनेत्री पूर्वा फडके या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं जाहीर त्या प्रोमोमधून करण्यात आलं होतं. त्यानंतर काल ‘शिवा’चा नवा प्रोमो प्रदर्शित झाला. ज्यामध्ये दमदार शिवाची जबरदस्ती एन्ट्री पाहायला मिळाली. ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘शिवा’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. याच प्रोमोवर काही नेटकऱ्यांनी या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आहेत का?, असं विचारलं. पण ‘शिवा’ मालिकेचा अमोल कोल्हे यांच्याशी काय संबंध? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

तर अमोल कोल्हे यांचा ‘शिवा’ या मालिकेशी संबंध आहे. कारण अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब क्रिएशन’ या प्रोडक्शन हाउसची निर्मिती ‘शिवा’ ही नवी मालिका आहे. त्यामुळेच काही नेटकरी ‘शिवा’ या मालिकेत अमोल कोल्हे असणार का? असं विचारत आहेत.

दरम्यान, ‘शिवा’ या मालिकेबरोबरच ‘पारु’ ही नवी मालिका देखील लवकरच सुरू होणार आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारु’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आता या नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader