अभिनेत्री सई लोकूर अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. आज सईने आपल्या गोंडस मुलीची पहिली झलक शेअर करत तिचं नाव जाहीर केलं. त्यामुळे सई सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सई लोकूर तिच्या मुलीचं नाव ‘ताशी’ ठेवलं आहे. हे नाव पाहून तिच्या चाहत्यांनी ‘नावाचा अर्थ नेमका काय?’ या प्रश्नाचा भडीमार पोस्टवर केला होता. त्यानंतर सईने पोस्ट एडिट करत नावाचा अर्थ सांगितला. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभा असा आहे. तसेच या नावाचं सिक्कीमशी खास कनेक्शन आहे. ते काय आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता झळकणार ‘धर्मवीर २’मध्ये, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाला…

‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेशी बोलताना सई म्हणाली की, “ताशीचं नाव मी आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ठरवलं होतं. ताशीचा अर्थ आहे ‘समृद्धी’. आम्ही आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सिक्कीमला गेलो होतो. तिकडे फिरताना मला ताशी View Point (व्ह्यू पॉइंट) दिसला. तेव्हाच मी माझ्या नवऱ्याला बोलले होते की, आपल्याला जर मुलगी झाली तर तिचं नाव आपण ताशी ठेवायचं.”

हेही वाचा – Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कमध्ये ‘बी टीम’ला एक चूक पडली महागात, थेट अंकिता लोखंडेसह ‘हे’ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी झाले नॉमिनेट

दरम्यान, सईने १७ डिसेंबर २०२३ रोजी गोंडस ताशीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी मुलीचं बारस झालं. पण त्यादिवशी सईने मुलीचं नाव जाहीर केलं नाही. अखेर आज सईने मुलीचं नाव जाहीर केलं.

Story img Loader