बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे कायम चर्चेत असतात. सध्या त्यांचा क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती १५’ची जबरदस्त चर्चा आहे. गेली कित्येक वर्षा बिग बी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या लाखों करोडो चाहत्यांशी आणि स्पर्धकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमात बिग बी सगळ्यांबरोबरच अगदी दिलखुलासपणे गप्पा मारतात. खासकरून या खेळात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबरोबर मजा मस्ती करत ते हा खेळ पुढे नेतात.
नुकत्याच या शोच्या नव्या एपिसोडमध्ये एका महिला स्पर्धकाने हजेरी लावली जीचं नाव होतं रेखा पांडे. या शोमध्ये सहभागी झाल्यावर त्यांनी स्पष्ट केलं की त्या अमिताभ यांचे सुपुत्र अभिषेक बच्चन यांच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. यावेळी त्यांनी अभिषेकची प्रचंड प्रशंसा केली. दरम्यान केबीसीच्या सेटवर अभिषेकने विचारलेला एक प्रश्न आणि अमिताभ यांनी दिलेलं उत्तर याचीदेखील रेखा यांनी आठवण करून दिली.
गेल्या सीझनमध्ये अभिषेक बच्चनने केबीसीच्या सेटवर हजेरी लावली होती अन् समोर बसलेल्या आपल्या वडिलांना म्हणजेच अमिताभ यांना प्रश्न विचारला होता की, “पा मी मुलगा म्हणून कसा आहे?” यावर अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिलेलं, “तू माझ्या जागेवर विराजमान आहेस म्हणजे नक्कीच तू तितका लायक आहेस.” या उत्तराने कित्येकांची मनं जिंकली होती अन् हीच आठवण रेखा यांनी केबीसी १५ च्या नव्या एपिसोडदरम्यान करून दिली.
आणखी वाचा : ‘अॅनिमल’मधून परिणीती चोप्राला का काढलं? संदीप रेड्डी वांगाने केला खुलासा
रेखा यांनी ही आठवण सांगितल्यावर बिग बी म्हणाले, “प्रत्येक वाडिलांना आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर गर्व असायला पाहिजे.” रेखा यांनी ‘केबीसी १५’ च्या या भागत ६,४०,००० रुपये जिंकले. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. यामुळेच संपूर्ण बच्चन कुटुंबीयच पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.