Gautam Rode Pankhuri Awasthy: अभिनेता गौतम रोडे व अभिनेत्री पंखुरी अवस्थी हे टीव्हीवरील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. दोघांची पहिली भेट ‘सूर्यपूत्र कर्ण’ मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या सेटवरच त्यांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. गौतम पंखुरीपेक्षा १४ वर्षांनी मोठा आहे. दोघांनी सहा वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. ते आता जुळ्या मुलांचे पालक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतम व पंखुरी यांनी त्यांच्या नात्यात आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. एकवेळ अशी आली होती जेव्हा गौतमने नातं संपवायचा निर्णय घेतला होता, असंही त्यांनी सांगितलं.
अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या शोमध्ये गौतम रोडे व पंखुरी अवस्थी यांनी हजेरी लावली. अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर या मुलाखतीची एक क्लिप शेअर केली आहे. यात गौतम व पंखुरी त्यांच्या नात्यातील कठीण काळाबद्दल बोलताना दिसतात. रिलेशनशिपमध्ये असताना ब्रेकअपचा विचार केला होता, असं अभिनेत्याने सांगितलं. गौतम म्हणाला, “मला वाटतं अडीच वर्षांत आमची दोन-तीन मोठी भांडणं झाली. एका क्षणी मला वाटलं की दोघांनी वेगवेगळ्या वाटेने जावं की एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करावे.” यावर पंखुरी म्हणाली “तू असा विचार करत होतास, मी नाही.” यावर गौतमने सहमती दर्शवली, “हो, मी याबद्दल विचार करत होतो, तू नाही.” पंखुरी म्हणाली, “मला वाटतं की जर तुम्ही एका नात्यात आहात तर ते टिकवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.”
२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम
सोबत राहण्यासाठी प्रयत्न करावा की नको यावरही चर्चा केल्याचं या जोडप्याने कबूल केलं. अनमोल गौतमला म्हणाला, “असे विचार करणं चुकीचं नाही. अशा परिस्थितीत अशी कोणती गोष्ट होती, ज्यामुळे एकत्र राहिलात?” त्यावर गौतम म्हणाला, “आजकाल असं घट्ट नातं असलेला जोडीदार किंवा कनेक्शन शोधणं खूप अवघड आहे. आयुष्यभर शोधूनही असे कनेक्शन मिळत नाही.”
गौतम व पंखुरीचे करिअर
गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी यांनी अल्वरमध्ये फेब्रुवारी २०१८ मध्ये लग्न केले आणि आता ते जुळ्या मुलांचे पालक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव रादित्य तर मुलीचे नाव राध्या आहे. त्यांची जुळी मुलं एक वर्षांची आहेत. गौतम शेवटचा टीव्ही शो ‘भाकरवाडी’मध्ये दिसला होता. तर, २०१४ मध्ये ‘ये है आशिकी’ मधून पदार्पण करणारी पंखुरी ‘रझिया सुलतान’ मध्ये मुख्य भूमिकेत होती. तसेच तिने ‘सूर्यपुत्र कर्ण’मध्ये द्रौपदीची भूमिका साकारली होती. तिने आयुष्मान खुरानाबरोबर एक चित्रपटही केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd