Rahul Mahajan: अभिनेत्री पायल रोहतगीने जुलै २०२२ मध्ये कुस्तीपटू संग्राम सिंहशी लग्न केलं. पण संग्रामआधी पायल तिच्या इतर रिलेशनशिपमुळेही चर्चेत राहिली होती. ती राहुल महाजनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी राहुलने मारहाण केल्याचा दावा पायलने केला होता. राहुल महाजनीने डिंपी गांगुलीशी लग्न करण्याआधी पायलला डेट केलं होतं.
पायल रोहतगी आणि राहुल महाजन बिग बॉस २ या रिॲलिटी शोमध्ये एकत्र झळकले होते. शो संपल्यानंतर त्यांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा या दोघांच्या नात्याची खूप चर्चा होती. दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर राहुल महाजनने राहुल दुल्हनिया ले जायेगा या रिॲलिटी शोमध्ये डिंपी गांगुलीशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर काही काळाने या दोघांमध्ये बिनसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. डिंपीने राहुलवर हिंसाचाराचे आरोप केले होते. त्याच काळात पायलनेही राहुलने मारहाण केल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. “त्याने मला दोनदा मारलं. एकदा त्याने माझे डोकं दारावर आपटलं. राहुलला राग येतो तेव्हा तो स्वतःवरचं नियंत्रण गमावतो आणि काय करतो हे त्याला माहीत नसतं,” असं पायल म्हणाली होती.
हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
राहुल महाजनने डिंपी गांगुलीशी केल्यावर तिने राहुलवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. पायल रोहतगीही या मुद्द्यावर व्यक्त झाली होती. “जेव्हा मी मागील मुलाखतीत डिंपी आणि राहुलबद्दल बोलले होते, तेव्हा डिंपीने या सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि म्हटलं होतं की तिच्या आणि राहुलमध्ये सर्व सगळं ठीक आहे. पण दुसऱ्याच दिवशी, त्याने तिला मारहाण केल्याची बातमी समोर आली. या गोष्टीवरून त्यांच्यातील गोष्टी किती सुरळीत होत्या, हे समजतं,” असं पायल रोहतगी म्हणाली होती.
हेही वाचा – भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक
डिंपी गांगुली व राहुल महाजन यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्याच वर्षी डिंपीने रोहित रॉयशी दुसरं लग्न केलं. डिंपी व रोहित यांना तीन अपत्ये आहेत. डिंपी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर आपल्या पती व मुलांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?
दरम्यान, पायल रोहतगीबद्दल बोलायचं झाल्यास ती अनेकदा तिच्या व्लॉगमध्ये तिची आणि पती संग्राम सिंहची भांडणंही अनेकदा दाखवत असते. वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोशल मीडियावर दाखवून प्रसिद्धी मिळवते, अशी टीकाही पायलवर नेटकरी करत असतात. पायल रोहतगी हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती, तिथे ती फर्स्ट रनर अप झाली होती.