छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरमोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र अजूनही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

सर्वसामान्य प्रेक्षकांपासून कित्येक सेलिब्रिटीजसुद्धा या शोचे चाहते होते. गानकोकिळा लता मंगेशकर यादेखील या कार्यक्रमाच्या चाहत्या होत्या. त्यांना ‘सीआयडी’ हा कार्यक्रम इतका आवडायचा की त्यांनी एके दिवशी अमेरिकेत थेट सोनीच्या कार्यालयात फोन करून कार्यक्रम बंद झाला असल्याची तक्रार केली होती. ‘सीआयडी’मधील दया हे लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या दयानंद शेट्टी याने नुकतंच याबद्दल खुलासा केला आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

आणखी वाचा : अभिमानास्पद! हॉलिवूड स्टार्ससाठी न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात येणार ‘सत्यशोधक’चा खास प्रीमियर

याविषयी बोलताना दयानंद म्हणाला, “लताजी अत्यंत तन्मयतेने त्यांच्या रूममध्ये बसून आमचा कार्यक्रम अगदी नियमितपणे पहायच्या आणि त्यांना फोटोग्राफीची फारच आवड होती. त्या एसीपी व इतर काही कलाकारांचे क्लोज अप फोटोज काढायच्या व ते प्रत्येकाला पाठवायच्या.” इतकंच नव्हे तर जेव्हा हा कार्यक्रम बंद झाला तेव्हा लतादीदी यांनी खुद्द अमेरिकेतील सोनीच्या कार्यालयात फोन करून तक्रार केली असल्याचंही दयानंदने सांगितलं.

तो म्हणाला, “जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हादेखील त्या व त्यांचे कुटुंबीय हा कार्यक्रम का थांबला याबद्दल विचारणा करायचे. त्यांनी त्यावेळी अमेरिकेतील सोनीच्या कार्यालयात फोन करून याबद्दल खंत व्यक्त केली होती. हा कार्यक्रम माझा अत्यंत आवडता आहे, कित्येक लोक फार आवडीने तो पाहतात तरी हा कार्यक्रम बंद का केलात? असा सवालही त्यांनी सोनीच्या कार्यालयात केला होता.”