सध्या मराठी मालिकाविश्वात चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून सोज्वळ आणि साध्या भोळ्या सायलीच्या भूमिकेतून जुईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. यापूर्वी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील तिच्या कल्याणी या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि ती घराघरात पोहोचली होती. अशी ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री जुई गडकरी हिच्या लग्नाची नेहमीच चर्चा रंगते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच जुईचं ४ फेब्रुवारी २०२४ला लग्न होणार असल्याच्या चर्चांचा उधाण आलं होतं. पण या लग्नाच्या चर्चांवर ती स्पष्ट बोलली होती. ‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना जुई म्हणाली होती, “असं काहीच नाही. आतापर्यंत जितक्या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्या मालिकांमध्ये माझं लग्न ४ फेब्रुवारीला झालं होतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही मी ४ फेब्रुवारीलाच लग्न करणार असं सगळेजण चिडवतात. म्हणून अमितने त्या मुलाखतीत उत्तर दिलं. खरंतर मी ४ फेब्रुवारीला लग्न करणार नाहीये. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अनेकदा अफवांमुळे कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.” पण आता पुन्हा एकदा जुईनं स्वतःच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

हेही वाचा – ‘बॉईज ४’ चित्रपटात ओंकार भोजने का नाही?; दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी केला खुलासा, म्हणाले…

जुई ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतंच तिनं ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला एका चाहत्याने “तुझं लग्न कधी आहे?” असा प्रश्न विचारला. यावर जुई गडकरी उत्तर देत म्हणाली, “लवकरच आहे. पत्रिका छापल्या की नक्की आमंत्रण देईल तुम्हाला.”

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेचा रेकॉर्डब्रेक टीआरपी; जुई गडकरीसह कलाकारांचा एकच जल्लोष, अभिनेत्री म्हणाली, “छप्पर फाडके…”

दरम्यान, सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीवरील झालेल्या हल्ल्यानंतर अर्जुन-सायलीच्या नात्यामध्ये गोड वळणं आलं आहे. दोघांचं नातं आता आणखी दृढ होताना पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर आता अर्जुन सायलीला बायको म्हणून स्वीकारण्यास तयार झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When is your wedding fan ask a question to tharla tar mag fame jui gadkari pps