अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमुळे सतत चर्चेत असते. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. जान्हवी व शुभ्रा या तेजश्रीच्या भूमिकेवर जितकं प्रेक्षकांनी प्रेम केलं, तितकंच आता मुक्तावर करताना दिसत आहेत. तिची मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली आहे. त्यामुळे मालिकाही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच तेजश्रीच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये चालू सीनमध्ये अभिनेत्री डायलॉग विसरल्यानंतर काय होतं? हे पाहायला मिळतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्याच्या ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ व ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या दोन मालिकांमध्ये सांगीतिक लढत झाली. यावेळी तेजश्री व अपूर्वा नेमळकर यांनी एक नाट्य केलं. यात तेजश्रीने अपूर्वाची भूमिका सावनी साकारली तर अपूर्वाने तेजश्रीची मुक्ता भूमिका साकारली. हे नाट्य सुरू झालं आणि नेमकं तेजश्री पुढचे डायलॉगचं विसरली. त्यानंतर अभिनेत्रीने सर्वांची माफी मागितली. मग पुन्हा एन्ट्री घेऊन हे नाट्य सुरू केलं. हा व्हिडीओ ‘मुक्ता-सागर फॉरएवर’ या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: ४७ वर्षांच्या बॉलीवूड अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, २१ वर्षांच्या पत्नीसह शेअर केले व्हिडीओ

या नाट्यात सावनीच्या रुपात तेजश्रीने एक भन्नाट उखाणा घेतला होता. तेजश्री उखाणा घेत म्हणाली होती, “चांदीच्या ताटात म्हावऱ्याचं तुकडं…चांदीच्या ताटात म्हावऱ्याचं तुकडं…ये सागऱ्या घास भरवते तुला, मेल्या थोबार कर इकडं…” या भन्नाट उखाण्यानंतर मंचावर एकच हशा पिकला.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ मध्ये कोणी मारली बाजी? कोणाला मिळाले सर्वाधिक पुरस्कार? वाचा

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या गेल्या आठवड्याच्या भागात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही टीम ‘प्रेमाची गोष्ट’च्या टीमवर वरचढ ठरली. १ लाख २०५ रुपये घंटाघरामधून आणून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने बाजी मारली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When premachi goshta fame tejashri pradhan forget her dialogue video goes viral pps