‘भाबीजी घर पे है’ या मालिकेत अंगुरी भाभी बनून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिल्पा शिंदेचा आज वाढदिवस आहे. शिल्पा आज तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘बिग बॉस ११’ ची विजेती शिल्पाने तिच्या अडीच दशकाच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केलं. १९९९ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शिल्पाला २००१ मध्ये आलेल्या ‘कभी आए न जुदाई’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष विद्यार्थी नव्हे तर त्यांच्या पहिल्या पत्नीनेच घेतलेला घटस्फोट; स्वतः कारण सांगत म्हणाल्या, “एकेदिवशी माझ्या…”

४८ वर्षांची शिल्पा अद्याप अविवाहीत आहे. लग्न न करण्यामागचं कारण तिचा साखरपुडा मोडणं आहे. तिने ‘बिग बॉस’च्या घरात लग्न मोडल्याचे खरे कारण सांगितले होते. तिने झी टीव्हीच्या ‘मायका’ मालिकेमध्ये अभिनेता रोमित राजबरोबर काम केलं होतं. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी २००९ मध्ये गोव्यात लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. रोमित शिल्पापेक्षा तीन वर्षांनी लहान होता. दोघांच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या, पण शिल्पाने करवा चौथच्या दोन दिवसांआधी लग्नास नकार दिला. हे लग्न मोडल्यानंतर तिने लग्नाचा विचार सोडून दिला.

“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा

एका मुलाखतीत शिल्पा म्हणाली होती की, तिला असं जाणवलं की रोमित भविष्यात कोणतीच तडजोड करणार नाही. तो समजून घेणारा नवरा होऊ शकत नाही. त्यामुळे तिने ते लग्न मोडलं. त्यानंतर शिल्पाने लग्न केलं नाही, पण रोमितने पुढच्याच वर्षी टीना कक्करशी लग्नगाठ बांधली. या दोघांना रेहा नावाची मुलगी आहे, त्यांच्या लग्नाला आता १३ वर्षे झाली आहेत.

दरम्यान, शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘चिडिया घर’, ‘देवों के देव महादेव’, ‘सीआयडी’, ‘मिस इंडिया’, ‘संजीवनी’ आणि ‘लपतागंज’, ‘भाबीजी घर पे है’ अशा मालिकांमध्ये काम केलंय. निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर तिने २०१६ मध्ये ‘भाबीजी घर पे है’ ही मालिका सोडली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shilpa shinde reveals why she called off marriage with romit raaj hrc