Shiv Thakre on Bigg Boss Marathi Winning Prize : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय, टीआरपीदेखील चांगला आहे, पण तरीही १०० दिवसांऐवजी फक्त ७० दिवसांत हा शो निरोप घेणार आहे. या शोच्या विजेत्याला खूपच कमी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. आता नुकत्याच झालेल्या महाचक्रव्यूह टास्कनंतर विजेत्याला किती रक्कम मिळणार, त्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान शिव ठाकरेचे एक जुने वक्तव्य चर्चेत आले आहे.

१० व्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. शेवटच्या टप्प्यात घरात महाचक्रव्यूह टास्क झाला. यात स्पर्धकांना २५ लाख जिंकण्याची संधी होती. ‘बिग बॉस’कडून एकूण चार जोड्या बनवण्यात आल्या होत्या. या चारही जोड्यांना प्रत्येकी ६ लाख २५ हजार रुपये जिंकायचे होते. पण कोणीच टास्कमध्ये अपेक्षित रक्कम जिंकू शकलं नाही, त्यामुळे १६ लाख ४० हजार रुपये स्पर्धकांनी गमावले आणि आता विजेत्याला फक्त ८ लाख ६० हजार रुपये मिळतील. ही रक्कम खूपच कमी आहे.

अरबाज पटेलचं ब्रेकअप! घराबाहेर आल्यावर ‘ती’ कमिटमेंट मोडली; स्वत:च खुलासा करत म्हणाला…

मराठमोळा शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता होता. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता. या शोचा विजेता ठरल्यावर त्याला बक्षीस म्हणून २५ लाख देण्यात आले होते, पण त्याला ही सगळी रक्कम मिळाली नव्हती. त्याला ११ लाखांच्या जवळपास पैसे मिळाले होते, असं त्यानेच सांगितलं होतं.

shiv thakre
शिव ठाकरे (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया

शिव ठाकरे काय म्हणाला होता?

भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांना दिलेल्या मुलाखतीत शिवने त्याला किती पैसे मिळाले ते सांगितलं होतं. “बिग बॉस मराठी जिंकल्यावर जे पैसे मिळाले, त्यातले अर्धे सरकारने नेले. २५ लाख होते, त्यातले आठ लाख दोन स्पर्धक हरल्यामुळे कमी झाले. माझ्यासाठी उरले १७ लाख, त्यातले माझ्या बँक खात्यात साडेअकरा लाख रुपये आले. मला माहित नव्हतं की शोमध्ये मिळतात त्या कपड्यांचे पैसे द्यावे लागतात. स्टायलिशची फी द्यावी लागते, आई-बाबा पहिल्यांदा विमानाने प्रवास करून आले होते, तर त्यांच्या तिकिटाचे पैसेही द्यावे लागले,” असं शिव म्हणाला होता.

“मी या घरात काहीही फोडू शकतो…”, बिग बॉसमध्ये एंट्री घेताच भडकला अभिजीत बिचुकले; अंकिताला म्हणाला, “तुमचा कुचकेपणा…”

२५ लाखांपैकी शिवला फक्त साडेअकरा लाख मिळाले होते. त्या तुलनेत पाचव्या पर्वाच्या विजेत्याला फक्त ८ लाख ६० हजार रुपये मिळणार आहेत. कोणत्याही कारणाने ही रक्कम वाढली नाही आणि शिवने म्हटलं त्याप्रमाणे सगळे डिडक्शन होत असतील तर या पर्वाच्या विजेत्याला ८ लाख ६० हजार रुपयांचे निम्मेही पैसे कदाचित मिळणार नाही. पाचव्या पर्वाच्या विजेत्याला नेमके किती पैसे मिळणार, ते ग्रँड फिनालेमध्येच कळेल.