लोकप्रिय रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १३’ १५ जुलैपासून ‘कलर्स’ वाहिनीवर सुरू झाला आहे. या शोची शूटिंग काही दिवसांपूर्वीच केपटाऊनमध्ये पार पडली. त्या वेळेस ‘बिग बॉस मराठी’चा विजेता शिव ठाकरे जखमी झाल्याचं त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. उजव्या हाताच्या बोटाला टाके पडल्याचा फोटो त्यानं पोस्ट केला होता. पण, या घटनेबाबत जेव्हा शिवच्या आईला समजलं, तेव्हा अभिनेत्याच्या आईची रिॲक्शन काय होती? याचा खुलासा त्यानं एका मुलाखतीतून केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच शिवने ‘अल्ट्रा मराठी बज’ या एंटरटेन्मेंट मीडियाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला ‘खतरों के खिलाडी १३’ हा शो करताना घरातील मंडळींनी कसा पाठिंबा दिला, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिव म्हणाला, “हा शो करताना मी जेव्हा जखमी व्हायचो किंवा मला अस्वस्थ वाटायचं, तेव्हा मी लगेच आईला फोन करायचो. माझं आणि आईचं रोज रात्री बोलणं व्हायचं. ती रोज रात्री माझ्या फोनची वाट बघत जागीच असायची. झोपायची नाही. केपटाऊनला जेव्हा १२ वाजले असायचे, तेव्हा इथे ३ वाजलेले असायचे. तीन-चार तासांचा फरक असायचा. जेव्हा मी मुंबईत होतो, तेव्हा मी आईला रोज भेटायचो; पण या जर्नीत तसं नव्हतं. माझी आई स्टंटचे नवनवीन व्हिडीओ पाहून सतत काळजीपोटी फोन करायची. एके दिवशी माझ्या आईनं जिजाऊंसारखं काम केलं. म्हणून मी तिला जिजाऊ म्हणतो.”

हेही वाचा – आता मोठ्या पडद्यावर बिग बी साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? चित्रपटाची कहाणी काय असणार जाणून घ्या

हेही वाचा – इर्शाळवाडी गावाचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत गिरीश ओक म्हणाले, “आताच्या त्रासापेक्षा नंतरची हळहळ जीवघेणी”

“या शोमध्ये स्टंट करताना एके दिवशी मी जखमी झालो. माझ्या हाताला टाके पडले होते. त्यामुळे मी एक-दोन स्टंट हरलो. हाताला टाके असल्यामुळे माझ्या हाती दोर येतच नव्हता. हाताचे टाके उघडतील अशीही भीती होती. अशा वेळी माझ्या डोक्यात पुढे स्टंट करू की नको, असं येऊ लागलं. त्या वेळेस मी आईला फोन करून या सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा आई म्हणाली, “तू स्टंट कर. हरलास तरी चालेल. पाहिजे तर स्टंट हरून शोबाहेर हो; पण स्टंट करण्यापूर्वीच डोक्यात असा विचार आणू नकोस की, मी तो करू शकत नाही. जिंकलास तर चांगलंच आहे. पण, स्टंट कर काहीही होत नाही. इथेच थांबू नकोस. तू लढ,'” असा मोलाचा सल्ला शिवच्या आईनं त्याला दिला होता.

हेही वाचा – “इज्जत की बची ना चिंधियाँ, वहाँ बिके पवार और सिंधिया…”; मणिपूरच्या घटनेवर स्वानंद किरकिरेंचा सणसणीत टोला

दरम्यान, ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये शिवव्यतिरिक्त रोहित रॉय, अर्चना गौतम, अर्जित तनेजा, डीनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, सौंदस मौफकीर, नायरा बॅनर्जी, शीझान खान, डेजी शहा व रश्मित कौर हे स्पर्धक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shiv thakare was injured during a stunt in khatron ke khiladi 13 what was his mothers reaction pps
Show comments