Bigg Boss 17 Grand Finale Live Streaming: बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. या शोचे सध्या १७ वे पर्व चालू असून ते अंतिम टप्प्यात आहे. ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले रविवारी (२८ जानेवारी २०२४ रोजी) होणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. तुम्हाला शोचा ग्रँड फिनाले कुठे, किती वाजता पाहता येईल, तसेच या शोच्या विजेत्याला बक्षीस म्हणून काय मिळेल, याबाबत जाणून घेणार आहोत.
ग्रँड फिनाले केव्हा, कुठे पाहता येईल?
चाहत्यांना रविवारी २८ जानेवारी रोजी जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर बिग बॉस १७ चा ग्रँड फिनाले पाहता येईल. हा ग्रँड फिनालेचा सोहळा साधारण ६ तासांचा असेल आणि रविवारी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल.
विजेत्याला किती पैसे मिळणार?
अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी ट्रॉफीसाठी भिडतील. सध्या विजेत्यांसाठी मतदान सुरू असून चाहते मत देतात आहेत. एबीपी लाइव्हच्या वृत्तानुसार, बक्षीस म्हणून विजेत्याला ट्रॉफी व ३० ते ४० लाख रुपये मिळतील, तसेच एक कारही मिळेल.
प्रत्येक पर्वाच्या ग्रँड फिनालेप्रमाणे या सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये देखील घराबाहेर गेलेले अनेक स्पर्धक भाग घेतील. त्यांचा डान्सही होईल. टॉप पाच स्पर्धकांचे डान्सही होतील. याशिवाय काही सेलिब्रिटी या शोच्या फिनालेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. सगळे परफॉर्मन्स संपल्यानंतर मध्यरात्री १२ वाजता सलमान खान विजेत्याची घोषणा करेल.