‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते किरण माने आता लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत किरण माने महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकेविषयी त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती दिली आहे.

हेही वाचा – लग्न न करताना अभिनेत्री झाली आई; ट्रोल झाल्यावर सोडलं मौन, म्हणाली, “मी आधीच…”

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत किरण माने यांनी सिंधुताईच्या आयुष्यातला बापमाणूस अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे.

भूमिकेविषयी किरण माने काय म्हणाले?

या भूमिकेविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून किरण माने म्हणाले की, आपल्या एखाद्या भूमिकेतनं, आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लै इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय. सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा ‘रियल लाईफ हिरो’, सिंधूताईंच्या आयुष्यातला ‘बाप’माणूस अभिमान साठे.

ज्याकाळात मुलांच्या बरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं. पाप मानलं जायचं. त्याकाळात ‘माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिनं शिकावं. मोठ्ठं व्हावं. तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नाव कमावेल’, हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं.

संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणार्‍या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या. संकटांचा वर्षाव झाला. पण त्यानं हार मानली नाही. “फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर… नामाचा गजर सोडू नये” या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं.

सिंधुताईंचं आयुष्यही लै लै लै भयाण संघर्षात गेलंय. आईलाही नकोशी असलेली ‘चिंधी’ ते अनाथांना हवीहवीशी माय ‘सिंधूताई’, हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाहीये.

मालिकाविश्वात खूप वर्षांनी खरंखुरं, तरल, भावस्पर्शी, प्रेरणादायी आयुष्य येतंय. ‘कलर्स मराठी’वर, १५ ऑगस्टपासून, संध्याकाळी ७ वाजता ‘सिंधुताई माझी माई’ नक्की बघा. आपल्या मुलामुलींना तर आवर्जुन दाखवा.

हेही वाचा – “माझा दादा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता अन्…” हेमांगी कवीने नितीन देसाईंच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाली, “असा निर्णय घेताना…”

हेही वाचा – “साम्राज्य उभं केलं असं वाटणारी माणसं आतून किती…”; दिग्दर्शक अक्षय इंडीकरची नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया

किरण मानेंच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेचा प्रोमो काल प्रदर्शित झाला. यामधून किरण माने यांची भूमिका जाहीर करण्यात आली.