‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ने प्रेक्षकांचा आज निरोप घेतला आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या मालिकेने ४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता उद्यापासून या मालिकेच्या जागी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका पाहायला मिळणार आहे. यामध्ये मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याचनिमित्तानं ‘स्टार प्रवाह’ या इन्स्टाग्राम पेजवर तेजश्रीचा एक नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; ज्यामध्ये तिनं सेटवर उशीरा येणाऱ्या कलाकारांची पोलखोल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मधील सायलीचा नणंदेबरोबर ‘बादल बरसा बिजुरी’वर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “पूर्णा आजी…”

‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला तेजश्रीला विचारलं जात की, ‘डे शिफ्ट की नाइट शिफ्ट?’ यावर तेजश्री म्हणते की, “डे शिफ्ट.” त्यानंतर तिला विचारलं जात की, ‘इंडोर शूट की आउटडोर शूट?’ ती म्हणते, “इंडोर.” मग विचारलं जात, ‘चहा की कॉफी?’ यावर तेजश्री म्हणते की, “दोन्ही नाही. फक्त गरम पाणी.”

हेही वाचा – ‘गदर २’च्या सक्सेस पार्टीत सलमान खानच्या घड्याळाने वेधलं लक्ष; किंमत वाचून व्हाल थक्क

पुढे विचारलं जात की, ‘सेटवर कोणाच्या डब्यात चविष्ट जेवण असतं?’ तर तेजश्री म्हणते की, “शुभांगी ताई.” त्यानंतर विचारलं जात की, ‘सेटवर उशिरा कोण येतं?’ यावर तेजश्री म्हणते की, “खरंतर कोणीच सेटवर उशीरा येत नाही. सगळे खूप प्रामाणिक आहेत. पण तरी सुद्धा सांगायचं झालं तर ठाण्यावरून येणारे कलाकार. सध्या घोडबंदर रोडचे खूप प्रोब्लेम सुरू आहेत. त्यामुळे ते कलाकार दोन-अडीच तास कारमध्येच प्रवास करत असतात.”

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरचं एका शब्दात केलं वर्णन; म्हणाली…

हेही वाचा – “…यामुळे सेटवर एका क्षणात शिवानी रांगोळेला येतं रडू” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम ऋषिकेश शेलारनं केली पोलखोल

दरम्यान, तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ‘ये है मोहेब्बतें’चा या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who comes late on the set of premachi gosht tejashri pradhan says pps